Home / महाराष्ट्र / Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा ‘तुर्की मध’ विक्रीचा नवा कारनामा उघड; ९ लाखांना विकली एक किलोची बाटली- अशोक खरातचा आणखी एक कारनामा

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा ‘तुर्की मध’ विक्रीचा नवा कारनामा उघड; ९ लाखांना विकली एक किलोची बाटली- अशोक खरातचा आणखी एक कारनामा

Ashok Kharat : अध्यात्म आणि दैवी शक्तीचा बनाव रचून भोळ्याभाबड्या जनतेला लुटणाऱ्या संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा...

By: Team Navakal
Ashok Kharat
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat : अध्यात्म आणि दैवी शक्तीचा बनाव रचून भोळ्याभाबड्या जनतेला लुटणाऱ्या संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कर्तृत्वाचा पाढा आता अधिकच विस्तारू लागला आहे. पोलीस तपासात दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत असून, खरातने केवळ आध्यात्मिक भीती दाखवूनच नव्हे, तर विविध प्रलोभने देऊन भक्तांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिंचुके आणि बनावट खडे चढ्या दराने विकून लूट केल्यानंतर, आता ‘तुर्की मध’ (Turkish Honey) विक्रीच्या नावाखाली त्याने फसवणुकीचे नवे जाळे विणल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

भोंदूबाबा खरातचा ‘एल्विश हनी’चा बनाव उघड; नऊ लाखांना एक किलो मध विकून उच्चभ्रूंना घातला गंडा
पोलीस तपासातून आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून, खरातने केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर समाजातील बड्या उद्योजकांना आणि राजकीय नेत्यांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. अतिशय दुर्मिळ आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून त्याने ‘एल्विश हनी’ (Elvish Honey) नावाच्या मधाची तब्बल नऊ लाख रुपये प्रति किलो या दराने विक्री केल्याचे उघड झाले आहे.

काय होता खरातचा बनाव?
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा ‘तुर्की मध’ विकताना अत्यंत कल्पक आणि भुलथापा देणाऱ्या कथा रचत असे. हा मध सामान्य नसून तो तुर्कस्तानमधील समुद्राच्या अत्यंत खोल आणि दुर्गम गुहांमधून काढला जातो, असा दावा तो करायचा. या मधाला त्याने ‘एल्विश हनी’ असे नाव दिले होते. निसर्गातील हा सर्वात दुर्मिळ ठेवा असून तो मिळवणे अत्यंत जिकिरीचे आहे, असे भासवून तो या मधाची किंमत लाखांच्या घरात सांगत असे. त्याच्या या भूलथापांना बळी पडून अनेक धनदांडग्यांनी या कथित अमृततुल्य मधासाठी मोठी रक्कम मोजली आहे.

शारीरिक व्याधींवर जालीम उपायाचे प्रलोभन
केवळ दुर्मिळता सांगूनच खरात थांबला नाही, तर या मधाचे औषधी गुणधर्म सांगताना त्याने अतिशयोक्तीची परिसिमाही ओलांडली होती. हा मध अत्यंत ‘कामोत्तेजक’ आणि ‘शक्तिवर्धक’ असून विशेषतः लैंगिक समस्यांवर हा रामबाण उपाय असल्याचा दावा तो करत असे. गुप्तरोग आणि शारीरिक दुर्बलता दूर करण्याचे आमिष दाखवून त्याने अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळले आहेत.

भोंदूबाबा अशोक खरातच्या पापांचा घडा भरला; मनी लॉन्ड्रिंगसह महिला अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल, आज न्यायालयात हजार करणार-
खरातने केवळ अंधश्रद्धेचा बाजार मांडून आर्थिक लूट केली नाही, तर या माध्यमातून जमा झालेली कोट्यवधींची माया ‘पांढरी’ करण्यासाठी (Money Laundering) आपल्या वैयक्तिक ट्रस्टचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. यासोबतच, त्याच्यावर एका विद्यार्थिनीसह अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे अत्यंत गंभीर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत.

आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगचे जाळे-
अशोक खरातने चिंचुके, बनावट रत्ने, तांत्रिक विधी आणि ‘एल्विश हनी’ सारख्या महागड्या वस्तूंच्या विक्रीतून अफाट संपत्ती गोळा केली. ही सर्व रक्कम त्याने आपल्या नावावर असलेल्या एका चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जमा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. भक्तांकडून घेतलेली रोकड कायदेशीर मार्गाने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी त्याने ट्रस्टचा ‘आडपडदा’ म्हणून वापर केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. अंमलबजावणी संचालनालय (ED) सारख्या यंत्रणांच्या मदतीने या आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विद्यार्थिनीसह महिलांवरील अत्याचाराचा घृणास्पद प्रकार
खरात विरोधात आतापर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल झाले असून, नुकत्याच तीन नवीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश असून, तिने खरातवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. लग्न जमवून देणे, विशेष पूजाविधी किंवा भविष्य सांगण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि त्यांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. या कृत्यांमुळे खरातच्या कृत्याची भीषणता आता चव्हाट्यावर आली असून, त्याने धार्मिकतेचा मुखवटा घालून केलेल्या या नराधम कृत्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यानुसार आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या