Home / क्रीडा / Hardik Pandya Ferrari : हार्दिक पांड्याची १२ कोटींची आलिशान ‘फरारी’ पोलिसांनी रोखली; काच खाली होताच पोलीस म्हणाले…

Hardik Pandya Ferrari : हार्दिक पांड्याची १२ कोटींची आलिशान ‘फरारी’ पोलिसांनी रोखली; काच खाली होताच पोलीस म्हणाले…

Hardik Pandya Ferrari : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा मैदानातील आपल्या कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील त्याच्या राजेशाही जीवनशैलीसाठी...

By: Team Navakal
Hardik Pandya Ferrari
Social + WhatsApp CTA

Hardik Pandya Ferrari : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा मैदानातील आपल्या कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील त्याच्या राजेशाही जीवनशैलीसाठी नेहमीच चर्चेत असतो. नुकताच हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामध्ये तो मुंबईच्या रस्त्यांवरून आपल्या अत्यंत महागड्या आणि आलिशान ‘फरारी’ कारमधून जाताना दिसत आहे. मात्र, याच प्रवासादरम्यान मुंबई पोलिसांनी त्याची गाडी तपासणीसाठी थांबवल्याने काही काळ परिसरात कुतूहल निर्माण झाले होते.

नेमकी घटना काय घडली?
अधिकच्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या आपल्या तब्बल १२ कोटी रुपये किमतीच्या ‘फरारी’ कारने मुंबईतील एका मुख्य रस्त्यावरून जात होता. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी नियमित तपासणीचा भाग म्हणून ही अतिवेगवान आणि महागडी कार बाजूला घेण्यास सांगितली. गाडीच्या काचा गडद असल्याने सुरुवातीला आत कोण बसले आहे, याची पोलिसांना पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा पोलिसांनी गाडीजवळ जाऊन तपासणी सुरू केली आणि कारची काच खाली झाली, तेव्हा समोर चक्क हार्दिक पांड्याला पाहून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काही क्षणांसाठी थक्क झाले. एक्सवर एका वापर कर्त्याने हा विडिओ शेयर केला आहे.

पोलिसांचा आदर आणि हार्दिकचे स्मितहास्य
आपल्या समोर भारतीय क्रिकेटचा खेळाडू बसलेला पाहून पोलिसांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. त्यांनी हार्दिकशी हस्तांदोलन करत “ओके साहेब, जा साहेब” असं म्हणत त्याला पुढे जाऊ दिलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

हार्दिक पांड्याच्या ताफ्यात १२ कोटींची ‘फरारी १२ सिलिंड्री’; आयपीएल २०२६ पूर्वी अष्टपैलू कर्णधाराचा रुबाब वाढला-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळासोबतच त्याच्या नव्या आलिशान वाहनामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. हार्दिकने आपल्या कार संग्रहात नुकतीच ‘फरारी १२ सिलिंड्री’ (Ferrari 12Cilindri) ही जगप्रसिद्ध सुपरकार समाविष्ट केली आहे. सुमारे १२ कोटी रुपये किंमत असलेल्या या कारने मुंबईच्या रस्त्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, आयपीएलच्या रणधुमाळीपूर्वी हार्दिकचा हा ‘रॉयल’ अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

काय आहे या १२ कोटींच्या कारची वैशिष्ट्ये?
हार्दिकने खरेदी केलेली ही ‘फरारी’ केवळ दिसायलाच देखणी नाही, तर ती एक शक्तिशाली इंजिन असलेली ‘ग्रँड टूरर’ प्रकारातील कार आहे. यामध्ये ६.५-लिटर अ‍ॅस्पिरेटेड V12 इंजिन देण्यात आले आहे, जे तब्बल ८३० हॉर्सपॉवरची प्रचंड ताकद् निर्माण करते. ताशी ३४० किलोमीटरपेक्षा अधिक वेग गाठण्याची क्षमता असलेली ही कार तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत आहे. या कारच्या अंतर्गत भागात (Interior) आधुनिक ‘ड्युअल-कॉकपिट’ डिझाइन आणि अद्ययावत डिजिटल डिस्प्ले देण्यात आले आहेत, जे तिला जगातील सर्वात आलिशान स्पोर्ट्स कारच्या श्रेणीत उभे करतात.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या