Home / Uncategorized / Donald Trump : अक्षरांच्या चुकीवरून इराणचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना टोला: “त्यांच्या प्राथमिक शिक्षकाला शोधून काढा!”; सोशल मीडियावर उपरोधिक टीका

Donald Trump : अक्षरांच्या चुकीवरून इराणचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना टोला: “त्यांच्या प्राथमिक शिक्षकाला शोधून काढा!”; सोशल मीडियावर उपरोधिक टीका

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपल्या आक्रमक विधानांसाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी चर्चेत असतात. मात्र, नुकत्याच...

By: Team Navakal
Donald Trump
Social + WhatsApp CTA

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपल्या आक्रमक विधानांसाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी चर्चेत असतात. मात्र, नुकत्याच एका पोस्टमध्ये त्यांनी केलेल्या शुद्धलेखनाच्या चुकांमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर उपहासाचा सामना करावा लागला आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा करताना ट्रम्प यांनी इंग्रजी शब्दांची चुकीची जुळणी केली, ज्यावर इराणच्या दूतावासाने अत्यंत धारदार आणि उपरोधिक भाषेत टीका केली आहे.

नेमका प्रकार काय?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणवरील संभाव्य लष्करी कारवाईत पाच दिवसांचा विरामान्वये (Pause) एक अधिकृत पोस्ट शेअर केली होती. या महत्त्वपूर्ण घोषणेमध्ये त्यांनी ‘pleased’ (आनंद झाला) ऐवजी ‘please’ (कृपया) आणि ‘which’ (जे/कोणते) ऐकी ‘witch’ (हडळ/जादूगीण) असे शब्द वापरले. एका राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत संदेशात अशा प्राथमिक स्तरावरील चुका पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ही चूक लक्षात येताच ट्रम्प यांनी ती पोस्ट हटवून दुरुस्त केलेल्या शुद्धलेखनासह पुन्हा प्रसारित केली, परंतु तोपर्यंत या प्रकरणाने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले होते.

इराणचा मर्मभेदी टोला: “शिक्षकाला जिवंत समोर आणा”-
इराणच्या दूतावासाने ट्रम्प यांच्या या चुकांची संधी साधत त्यांना समाजमाध्यमांवर चांगलेच धारेवर धरले. इराणने ट्रम्प यांच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना म्हटले की, “आम्हाला त्यांच्या (ट्रम्प यांच्या) प्राथमिक शाळेतील शिक्षक जिवंत हवे आहेत.” या विधानाचा रोख स्पष्ट होता की, अमेरिकेसारख्या महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाला साधे ‘which’ आणि ‘witch’ यातील फरक कळत नाही, हे त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचे अपयश आहे. इराणच्या या खोचक टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या ‘ट्रोलिंग’ची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

सोशल मीडियावरील वादाचा नवा अंक-
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शुद्धलेखनाच्या चुका ही काही नवीन बाब नाही. यापूर्वीही अनेकदा त्यांच्या ट्विट्समधील विसंगतींवरून चर्चा झाली आहे. मात्र, यावेळी इराणसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी देशाने थेट त्यांच्या शिक्षणावर आणि शालेय शिक्षकांवर बोट ठेवल्याने हे प्रकरण अधिकच रंजक बनले आहे. एकीकडे दोन्ही देशांमधील लष्करी तणाव कमी करण्यासाठी पाच दिवसांचा विराम जाहीर करण्यात आला असला, तरी शब्दांच्या युद्धात मात्र इराणने वरचढ ठरण्याचा प्रयत्न केला आहे.

अक्षरांच्या चुका आणि डोनाल्ड ट्रम्प: ‘कोवफेफे’पासून ते ‘हॅम्बर्गर्स’पर्यंत; ट्रम्प यांच्या गाजलेल्या भाषिक घोडचुकांचा इतिहास-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सोशल मीडियावरील ‘ट्विट्स’ हे नेहमीच जागतिक राजकारणात वादाचे केंद्र राहिले आहेत. मात्र, त्यांच्या आक्रमक विधानांइतकीच चर्चा त्यांनी केलेल्या अजब शुद्धलेखनाच्या चुकांचीही (Spelling Blunders) झाली आहे. इराणने नुकताच त्यांच्या ‘Witch’ आणि ‘Which’ मधील फरकावरून घेतलेला समाचार हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही ट्रम्प यांच्या अनेक शब्दांनी शब्दकोश निर्मात्यांना चक्रावून सोडले होते.

१. जगप्रसिद्ध ‘कोवफेफे’ (Covfefe) प्रकरण-
ट्रम्प यांच्या डिजिटल इतिहासातील सर्वात मोठी आणि अनाकलनीय चूक म्हणजे ‘Covfefe’ हा शब्द. ३१ मे २०१७ रोजी मध्यरात्री त्यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये “Despite the constant negative press covfefe” असे अर्धवट वाक्य होते. ‘Coverage’ (कव्हरेज) हा शब्द लिहिताना त्यांच्याकडून ही चूक झाली असावी, असा अंदाज वर्तवला गेला. मात्र, हा शब्द सहा तास तसाच राहिल्याने इंटरनेटवर मिम्सचा पूर आला होता. नंतर ट्रम्प यांनी गमतीने विचारले होते, “कोवफेफेचा खरा अर्थ कोणाला माहीत आहे का?”

२. ‘हॅम्बर्गर्स’ की ‘हॅमबर्डर्स’ (Hamberders)?
जानेवारी २०१९ मध्ये, जेव्हा ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एका फुटबॉल संघासाठी मेजवानी आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘हॅम्बर्गर्स’ मागवले होते. या घटनेचे वर्णन करताना त्यांनी ‘Hamburgers’ ऐवजी ‘Hamberders’ असा शब्द वापरला. ही चूक इतकी गाजली की ‘बर्गर किंग’ सारख्या मोठ्या कंपन्यांनीही त्यांच्यावर उपरोधिक टीका केली होती. खाण्यापिण्याच्या वस्तूचे नावही राष्ट्राध्यक्षांना लिहिता येत नाही, म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

३. ‘अनप्रिसिडेंटेड’ की ‘अनप्रिन्सडेंन्टल’ (Unpresidented)?
चीनने अमेरिकेचे एक ड्रोन जप्त केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना ‘Unprecedented’ (अभूतपूर्व) ऐवजी ‘Unpresidented’ असे लिहिले होते. गंमत म्हणजे, या चुकीच्या शब्दाचा अर्थ ‘राष्ट्राध्यक्ष नसलेला’ असा निघत होता. स्वतःच्या पदाच्या स्पेलिंगमध्येच त्यांनी केलेली ही गल्लत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये थट्टेचा विषय ठरली होती. डिक्शनरी डॉट कॉम (Dictionary.com) सारख्या संकेतस्थळांनीही त्यावेळी त्यांच्या या नवीन शब्दावर मिश्कील टिप्पणी केली होती.

४. इतर काही लक्षवेधी चुका
ट्रम्प यांनी एकदा आपली पत्नी मेलानिया यांच्या नावाचा उल्लेख करतानाही ‘Melanie’ असा केला होता. तसेच, कोलंबिया (Colombia) या देशाचा उल्लेख त्यांनी ‘Columbia’ (अमेरिकेतील एका शहराचे नाव) असा केला होता. ‘Heal’ (बरे होणे) ऐकी ‘Heel’ (टाच) आणि ‘Council’ (परिषद) ऐवजी ‘Counsel’ (सल्लागार) अशा अनेक शब्दांच्या चुका त्यांच्या पोस्टमध्ये वारंवार दिसून आल्या आहेत.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या