Cyber Fraud Alert: सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ही परिस्थिती पाहता सरकारकडून गॅस पाईपलाईनला (PNG) प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार आता ग्राहकांना ‘कनेक्शन बंद’ करण्याची भीती दाखवून लुटत आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही मेसेजला बळी पडण्यापूर्वी पूर्णपणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
फसवणुकीचा हा बनावट मेसेज ओळखा
सायबर भामटे ग्राहकांना व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे खालीलप्रमाणे मेसेज पाठवत आहेत:
“Your MGL GAS PNG connection service will be stopped tonight at 07:30PM. Please Contact Our MGL Officer Mr.Manish Rathore Call 09608151607 (TeamMGL)”
हा मेसेज पूर्णपणे खोटा असून, दिलेल्या नंबरवर संपर्क साधल्यास तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.
अशी घ्या काळजी (Stay Alert, Stay Secure!)
महानगर गॅस लिमिटेडने (MGL) ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:
- अधिकृत नंबरची पडताळणी करा: MGL कडून येणाऱ्या संदेशांसाठी नेहमी त्यांचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर +91-98992 03843 तपासा. या नंबरच्या नावापुढे ‘ब्लू टिक’ असल्याची खात्री करा.
- अनोळखी नंबरवर कॉल करू नका: मेसेजमध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही वैयक्तिक नंबरवर (उदा. वरील मेसेजमधील मनिष राठोड) कॉल करू नका. अधिकृत अधिकारी कधीही वैयक्तिक नंबरवरून अशी धमकी देत नाहीत.
- संशयास्पद लिंक टाळा: बिलाचे पैसे भरण्यासाठी किंवा माहिती अपडेट करण्यासाठी कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका.
मदत आणि तक्रारीसाठी येथे संपर्क साधा
जर तुम्हाला गॅस कनेक्शनबद्दल काहीही शंका असेल किंवा मदतीची गरज असेल, तर केवळ अधिकृत हेल्पलाइन नंबरवरच कॉल करा:
- MGL हेल्पलाइन: (022) 68674500 | (022) 6156 4500
- अधिकृत व्हॉट्सॲप: +91-98992 03843
लक्षात ठेवा, कोणतीही गॅस कंपनी रात्रीच्या वेळी अचानक कनेक्शन कापण्याची धमकी देत नाही. अशा प्रकारचा मेसेज आल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करा.










