Home / महाराष्ट्र / Ashok Kharat Case Nashik Crime News : अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी तब्बल १५० कोटींचा निधी केला होता मंजूर; २०१८ च्या जीआरमध्ये धक्कादायक माहिती उघड..

Ashok Kharat Case Nashik Crime News : अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी तब्बल १५० कोटींचा निधी केला होता मंजूर; २०१८ च्या जीआरमध्ये धक्कादायक माहिती उघड..

Ashok Kharat Case Nashik Crime News : ज्योतिषविद्येच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेला...

By: Team Navakal
Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case Nashik Crime News : ज्योतिषविद्येच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप असलेला स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने काल (२४ मार्च) झालेल्या सुनावणीअंती खरातला २९ मार्चपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान आता केवळ शोषणाचेच नव्हे, तर खरातच्या आश्रमासाठी मिळालेल्या अवाढव्य शासकीय निधीचेही धक्कादायक धागेदोरे हाती लागत आहेत.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान, पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. खरातने पीडित महिलांना कशा प्रकारे जाळ्यात ओढले आणि त्यांच्यावर अत्याचार केले, याचे सविस्तर पुरावे गोळा करण्यासाठी तसेच या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अधिक कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तपासाची व्याप्ती लक्षात घेता पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटींचा सरकारी निधी-
या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. अशोक खरात याच्या ‘ईशान्येश्वर’ मंदिरासाठी शासनाकडून मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, अशी माहिती एका शासन निर्णयाद्वारे (GR) समोर आली आहे. २०१८ मधील तत्कालीन पर्यटन मंत्र्यांच्या कार्यकाळात या मंदिराच्या विकासासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. ३१ मार्च २०१८ रोजी यासंदर्भातील अधिकृत जीआर निर्गमित करण्यात आला होता.

या निधीतून खालील कामांचे नियोजन करण्यात आले होते-
१. भव्य सभामंडपाचे बांधकाम..
२. परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे.
३. स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे व चेंजिंग रूमची व्यवस्था.
४. भक्तनिवासाचे बांधकाम.

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातची काळी कृत्यं उघड: शिर्डीत सातवा गुन्हा दाखल; दैवी शक्तीची भीती दाखवून तरुणीवर अत्याचार-
आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता भरत चालला आहे. नाशिकमधील अत्याचाराच्या गुन्ह्यानंतर आता शिर्डीमध्ये खरातविरोधात सातवा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला गुंगीचे औषध देऊन तब्बल चार वेळा तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, या स्वयंघोषित ज्योतिषाचा खरा चेहरा आता समाजासमोर येत आहे.

कौटुंबिक विश्वासाचा केला घात-
पीडित तरुणीचे कुटुंब शेतात घर बांधण्यासाठी वास्तूशास्त्रानुसार योग्य जागा सुचवावी, या आशेने खरातकडे गेले होते. या भेटीदरम्यान कुटुंबाचा विश्वास संपादन केल्यानंतर, तिसऱ्या भेटीत पीडितेच्या उच्च शिक्षणाबाबत (कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा) सल्ला विचारण्यात आला. याच विश्वासाचा गैरफायदा घेत जुलै ते डिसेंबर २०२४ या कालावधीत खरातने पीडितेवर चार वेळा अत्याचार केले. विशेष म्हणजे, गुंगीचे औषध देऊन हे कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

केवळ शारीरिक शोषण करूनच खरात थांबला नाही, तर त्याने पीडितेला मानसिकरीत्याही खचवले. “जर या प्रकाराची कुठेही वाच्यता केलीस, तर माझ्याकडे असलेल्या दैवी शक्तीचा वापर करून तुझ्या आई-वडिलांना ठार मारून टाकीन,” अशी भीती त्याने पीडितेला घातली होती. या दहशतीमुळे पीडित तरुणी इतके दिवस गप्प होती, मात्र आता तिने धैर्याने पुढे येत पोलिसांत प्रथम खबरीत (FIR) सर्व हकीकत सांगितली आहे.

कोण आहे हा अशोक खरात?
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’चा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर त्याने स्वतःला ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ (ब्रह्मांडशास्त्र तज्ञ) आणि ‘अंकशास्त्रज्ञ’ म्हणून प्रस्थापित केले होते. अल्पावधीतच त्याने आपले जाळे इतके विस्तारले होते की, अनेक बडे राजकीय नेते, त्याच्याकडे सल्ल्यासाठी जात असत. त्याच्या या वलयाचा वापर तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी करत असल्याचे तपासात उघड होत आहे.

नाशिकमधील अटकेनंतर गुन्ह्यांची मालिका-
खरातचे काळे कारनामे सर्वप्रथम नाशिकमध्ये उघड झाले. १८ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नाशिक गुन्हे शाखेने एका ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून त्याला ताब्यात घेतले होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या