Dheeraj Deshmukh trolled – भाजपा नेते आणि व्यावसायिक मोहित कंबोज यांच्या कन्या मिश्का कंबोज हिचा 16 वा वाढदिवस मुंबईत अत्यंत शाही आणि दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या भव्य कार्यक्रमात एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली. काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या शर्टवरील प्रिंटमुळे नेटिझन्समध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्यांना सावरकर की मार्लन ब्रँडो असे ट्रोल करण्यात आले आहे.
काही एक्स पोस्ट वापरकर्त्यांनी त्या प्रिंटमधील चेहरा हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा असल्याचा दावा केला. हा शर्टवरचा फोटो वीर सावरकरांचा आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. यावरून विविध प्रतिक्रिया उमटल्या. धीरज देशमुख यांच्या शर्टवर कुणाचा फोटो आहे? असा प्रश्न विचारत अनेकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तर उपरोधिक टिप्पणी करत काँग्रेस समर्थक सांगा, हा माणूस विरोधी पक्षाच्या कार्यक्रमाला कशासाठी गेला होता?अशा आशयाचे प्रश्न उपस्थित केले.
या चर्चेला वेगळे वळण देत एका वापरकर्त्याने स्पष्ट केले की, शर्टवरील फोटो हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नसून हॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मार्लन ब्रँडो यांचा आहे. मार्लन ब्रँडो हे दोन वेळा ऑस्कर पुरस्कार विजेते आणि अमेरिकन चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रभावशाली अभिनेते व दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांचे 2004 साली निधन झाले. या सर्व प्रकारामुळे एका बाजूला वाढदिवसाचा शाही सोहळा चर्चेत राहिला, तर दुसर्या बाजूला धीरज देशमुख यांच्या शर्टवरील प्रिंटमुळे राजकीय टोलेबाजीला उधाण आले.
हे देखील वाचा –
इराणवर होणार अणुहल्ला? संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याचा दावा; दिला पदाचा राजीनामा
नीलम गोर्हे काळ्या हृदयाची व खोटारडी बाई ! किशोरी पेडणेकरांची खालच्या पातळीची टीका










