Home / Uncategorized / Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास तीव्र; पत्नी कल्पना खरातविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास तीव्र; पत्नी कल्पना खरातविरोधात ‘लूकआउट’ नोटीस जारी

Ashok Kharat Case : ढोंगी प्रवृत्तीने भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचा गुंता आता अधिकच वाढत चालला आहे. या प्रकरणातील...

By: Team Navakal
Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Ashok Kharat Case : ढोंगी प्रवृत्तीने भाविकांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचा गुंता आता अधिकच वाढत चालला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार असून, विशेष तपास पथकाने (SIT) आता आपला मोर्चा खरातच्या नातेवाईकांकडे वळवला आहे. दोन दिवस शोध घेऊनही कल्पना खरातचा सुगावा न लागल्याने प्रशासनाने तिच्याविरोधात ‘लूकआउट’ नोटीस बजावली आहे, जेणेकरून ती देशाबाहेर पळ काढू शकणार नाही.

नातेवाईकांची कसून चौकशी
एसआयटीने या तपासाचा भाग म्हणून अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा एकदा सखोल चौकशी केली. तसेच, कल्पना खरातच्या दोन भावांनाही चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. विशेषतः जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांमध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे प्राथमिक पुरावे तपासादरम्यान हाती आले आहेत.

माहेरच्यांशी १६ वर्षांपासून तुटलेला संपर्क
तपास पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पनाच्या माहेरी जाऊन चौकशी केली. मात्र, तेथे मिळालेली माहिती थक्क करणारी होती. नातेवाईकांनी दिलेल्या जबाबानुसार, गेल्या १६ वर्षांपासून कल्पनाचा तिच्या माहेरच्यांशी कोणताही संपर्क नव्हता. अशोक खरात तिला माहेरी जाऊ देत नसे आणि कोणाला भेटूही देत नसे. कल्पनाचे माहेरचे लोक अत्यंत सामान्य असून ते अल्पशा शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत कल्पनाने भावांसोबत केलेले कथित आर्थिक व्यवहार एसआयटीसाठी तपासाचा महत्त्वाचा बिंदू ठरत आहेत.

शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरण
केवळ धार्मिक विधींच्या नावाखाली लूटच नव्हे, तर जमिनीच्या व्यवहारातही खरात दाम्पत्याने हातपाय पसरले होते. शिर्डी येथील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणावरून फसवणूक केल्याचा आरोप कल्पना खरातवर आहे. या व्यवहारात फसवणूक करण्यासाठी कट रचल्याचा संशय असून, त्या दृष्टीने नातेवाईकांची आणि मुलाची चौकशी केली जात आहे.

शिवनिका संस्थानचे संचालक रडारवर
अशोक खरातच्या इशान्येश्वर मंदिराच्या ‘शिवनिका संस्थान’वर कार्यरत असलेल्या तीन संचालकांनाही एसआयटीने चौकशीच्या फेऱ्यात ओढले आहे. अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच धार्मिक विधींच्या नावाखाली भाविकांना कोट्यवधी रुपयांना गंडवले आहे. ही अवैध माया पचवण्यासाठी शिवनिका संस्थानचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या