Home / लेख / Hero Vida VX2 Plus: हिरोचा धमाका! लाँच केली तब्बल 187 किमी धावणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; अवघ्या 65 मिनिटांत होणार चार्ज

Hero Vida VX2 Plus: हिरोचा धमाका! लाँच केली तब्बल 187 किमी धावणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; अवघ्या 65 मिनिटांत होणार चार्ज

Hero Vida VX2 Plus: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरोने इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी एक मोठा...

By: Team Navakal
Hero Vida VX2 Plus: हिरोचा धमाका! लाँच केली तब्बल 187 किमी धावणारी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; अवघ्या 65 मिनिटांत होणार चार्ज
Social + WhatsApp CTA

Hero Vida VX2 Plus: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरोने इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी एक मोठा पाऊल उचलले आहे. कंपनीने आपल्या विडा सिरीज अंतर्गत Hero Vida VX2 Plus चे नवीन आणि अपग्रेडेड मॉडेल भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केले आहे. या नवीन स्कूटरमध्ये अधिक शक्तिशाली 4.4kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 3.4kWh व्हेरियंटच्या तुलनेत ही नवीन स्कूटर ग्राहकांना खूप जास्त मायलेज (रेंज) देणार आहे, तर तिची गती आणि इंजिनची ताकद जुन्या मॉडेलसारखीच दमदार ठेवण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,43,990 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल 187 किमी धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

घरी काढून चार्ज करता येणार बॅटरी; तांत्रिक रचनेत मोठा बदल

या नवीन स्कूटरमधील बॅटरी सेटअप आणि त्याचे मुख्य तांत्रिक फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:

  • रिमूव्हेबल बॅटरी सुविधा: या नवीन मॉडेलमध्ये 2.2kWh क्षमतेचे 2 वेगळे बॅटरी पॅक वापरण्यात आले आहेत, जे एकत्र मिळून 4.4kWh ची पॉवर तयार करतात. या बॅटऱ्या स्कूटरमधून बाहेर काढून घरी किंवा ऑफिसमध्ये सहज चार्ज करता येतात.
  • वाढलेली रेंज क्षमता: नवीन बॅटरीमुळे ही स्कूटर 187 किमीची आयडीसी (IDC) रेंज देते. जुन्या 3.4kWh व्हेरियंटची रेंज केवळ 146 किमी इतकी होती, म्हणजेच नव्या स्कूटरमध्ये प्रवाशांना 41 किमीची अतिरिक्त रेंज मिळणार आहे.

डबल पॉवरचा चार्जर; अवघ्या ६५ मिनिटांत होणार चार्ज

बॅटरी चार्जिंगचा वेळ कमी करण्यासाठी हिरोने चार्जर तंत्रज्ञानात मोठी सुधारणा केली आहे:

१. पोर्टेबल चार्जर: या स्कूटरसोबत 1kW क्षमतेचा पोर्टेबल चार्जर मोफत दिला जात आहे, जो जुन्या व्हेरियंटच्या चार्जरपेक्षा दुप्पट शक्तिशाली आहे. या चार्जरच्या मदतीने घरच्या घरी स्कूटर केवळ 3 तास 17 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते, तर 100 टक्के चार्जिंगसाठी 5 तास 8 मिनिटांचा वेळ लागतो.

२. फास्ट चार्जिंग सपोर्ट: जर तुम्ही प्रवासादरम्यान डीसी (DC) फास्ट चार्जरचा वापर केला तर ही स्कूटर अवघ्या 65 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तर पूर्णपणे 100 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 2 तास 30 मिनिटांचा अवधी लागतो. कंपनीचे देशभरात 6,000 पेक्षा जास्त फास्ट चार्जिंग स्टेशनचे जाळे कार्यरत आहे.

दमदार मोटर, ३ रायडिंग मोड्स आणि आधुनिक डिस्प्ले

पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ही स्कूटर अतिशय आधुनिक फीचर्सने सज्ज करण्यात आली आहे:

स्मार्ट स्क्रीन: प्रवासादरम्यान मदतीसाठी स्कूटरमध्ये 4.3 इंचाचा टीएफटी (TFT) डिस्प्ले दिला आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सिस्टीमला सपोर्ट करतो.

मोटर आणि टॉप स्पीड: स्कूटरमध्ये 6kW क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे जी 26nm चा टॉर्क जनरेट करते. या स्कूटरचा टॉप स्पीड 90kmph चा आहे.

रायडिंग मोड्स आणि बूस्ट: वेगवेगळ्या रस्त्यांसाठी यात इको, राईड आणि स्पोर्ट असे 3 रायडिंग मोड्स मिळतात. याशिवाय, ओव्हरटेक करताना गाडीचा वेग तात्पुरता वाढवण्यासाठी यात एक विशेष ‘बूस्ट’ फंक्शन देखील देण्यात आले आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या