Home / क्रीडा / Shreyas Iyer : विजय मिळवूनही श्रेयस अय्यर अडचणीत! पंजाब किंग्सच्या कॅप्टनला आयपीएलकडून 24 लाखांचा मोठा दंड

Shreyas Iyer : विजय मिळवूनही श्रेयस अय्यर अडचणीत! पंजाब किंग्सच्या कॅप्टनला आयपीएलकडून 24 लाखांचा मोठा दंड

Shreyas Iyer fine for slow over rate IPL 2026 CSK vs PBKS : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब...

By: Team Navakal
Shreyas Iyer fine for slow over rate IPL 2026 CSK vs PBKS
Social + WhatsApp CTA

Shreyas Iyer fine for slow over rate IPL 2026 CSK vs PBKS : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. मात्र, या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. स्लो ओव्हर रेटच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने श्रेयस अय्यरवर मोठी दंडात्मक कारवाई केली आहे.

श्रेयस अय्यरला 24 लाखांचा दंड

पंजाब किंग्सने या हंगामात सलग दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटचा गुन्हा केला आहे. यापूर्वी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यातही हीच चूक झाली होती. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार हा या हंगामातील दुसरा गुन्हा ठरल्यामुळे, श्रेयस अय्यरला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

केवळ कर्णधारच नाही, तर पंजाबच्या प्लेइंग 11 मधील इतर सर्व खेळाडूंना आणि इम्पॅक्ट प्लेयरला देखील प्रत्येकी 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25 टक्के (जे कमी असेल ते) दंड भरावा लागणार आहे.

सामन्याचा थरार: पंजाबचा सलग दुसरा विजय

दंडाची कारवाई झाली असली तरी मैदानात पंजाबने आपली ताकद दाखवून दिली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 209 धावांचा डोंगर उभा केला होता. चेन्नईकडून तरुण फलंदाज आयुष म्हात्रे याने 43 चेंडूत 73 धावांची वादळी खेळी केली, तर शिवम दुबेने नाबाद 45 धावांचे योगदान दिले.

विजयासाठी मिळालेले 210 धावांचे लक्ष्य पंजाबने 18.4 ओव्हर्समध्येच गाठले. पंजाबच्या विजयात कर्णधार श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या 29 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या विजयामुळे पंजाबने या हंगामात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. मात्र, जर तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटची चूक झाली, तर कर्णधारावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार असू शकते.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या