Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar : बारामती-राहुरीत काँग्रेस आज उमेदवार देणार ! सुनेत्रा पवार बिनविरोध नाही

Sunetra Pawar : बारामती-राहुरीत काँग्रेस आज उमेदवार देणार ! सुनेत्रा पवार बिनविरोध नाही

Sunetra Pawar : राज्यातील बारामती व राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या दुपारी उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी...

By: Team Navakal
Come Early Go Early :
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : राज्यातील बारामती व राहुरी विधानसभा  पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या दुपारी उमेदवार जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यामुळे दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितल्याची चर्चा आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शरद पवार यांनीही खाजगी गप्पात उध्दव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा देऊ असे म्हणाले . मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची ठाम भूमिका
मांडली आहे.


हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,2024 विधानसभा निवडणुकीत बारामती – राहुरी  या दोन्ही जागा  मविआने तुतारी चिन्हावर लढल्या होत्या.मात्र यावेळी ते  लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी   लढण्यासाठी तयार आहे अशी सविनय भूमिका काँग्रेस पक्षाची होती. उद्यापर्यंत उमेदवाराचे  नाव काँग्रेस   पक्षाच्यावतीने आम्ही अंतिम करणार आहोत. पक्ष या दोन्ही जागांवर उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम आहे.यासंदर्भात आमची राज्यस्तरावरील सर्व नेत्यांशी चर्चा झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील आमचा संवाद आहे. उद्या दुपारपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.  काँग्रेसला वंचित पक्षाने पाठिंबा दिला आहे.


संजय राऊत म्हणाले की,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यांनी बारामती पोटनिवडणुकीविषयी चर्चा केली. पक्षप्रमुखांशी सुनेत्रा वहिनींनी त्यासंदर्भात काय चर्चा झाली किंवा ते काय निर्णय देणार? तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम आहे. त्यांनी चार ते पाच उमेदवारांच्या मुलाखतीही  घेतल्या आहेत.


मविआमध्ये जरी असलो तरी हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे  उद्धव ठाकरे यांचे तत्कालीन मुख्यमंत्री कालावधीतील विश्वसनीय सहकारी होते. त्यामुळे याबाबत ते स्वत:च स्पष्ट भूमिका मांडतील. काँग्रेस या निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार असेल तर याकडे मविआ म्हणून लक्ष घालण्याची आवश्यकता नाही. परंतु उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे पक्षप्रमुख याबाबत त्यांची भूमिका सांगतील. यापूर्वी भाजपा आणि अजित पवार यांनीही विधानसभा सदस्याच्या निधनानंतर अनेकदा उमेदवार दिल्याचा इतिहास आहे. पिंपरी – चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अजित पवार यांनी अश्विनी जगताप यांच्या विरोधात नाना काटे यांना उमेदवारी दिली होती.

भावना फक्त शिवसेनेलाच असतात.ही निवडणूक महायुती विरुद्ध मविआ अशीच होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती आहे. परंतु इतर पक्षांशी चर्चा केली का ? यासंदर्भात माहिती नाही. याबाबत जय पवार म्हणाले की, माझ्यासह सर्व बारामतीकरांना  निवडणूक बिनविरोध व्हावी असे वाटते. बारामतीकर कोणासोबत आहे हे सर्वाना माहीत आहे.  मात्र विरोधकांना लढायचे असेन तर त्यांनी लढावे. तर शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख म्हणाले की, या निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणार आहे. मात्र माझे मत आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राहुरी विधानसभा पोटनिवडणूकही बिनविरोध होणार नाही , भाजपाने कर्डिले यांच्या पुत्राला उ

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या