Bhuvneshwar Kumar 200 IPL wickets record : आयपीएल 2026 च्या 11 व्या सामन्यात बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रविवारी एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लढतीत अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आयपीएल कारकिर्दीतील आपला 200 वा बळी मिळवला. आयपीएलच्या इतिहासात हा मैलाचा दगड गाठणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आणि एकूण दुसरा गोलंदाज ठरला आहे.
वेगवान गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान
36 वर्षीय भुवनेश्वर कुमारने आपल्या 192 व्या सामन्यात हा विक्रम प्रस्थापित केला. चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला बाद करून त्याने ही द्विशतकी मजल मारली. यापूर्वी केवळ युझवेंद्र चहलने (224 बळी) हा टप्पा पार केला होता. वेगवान गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वरने ड्वेन ब्राव्हो आणि जसप्रीत बुमराह (दोन्ही 183 बळी) यांना बरेच मागे टाकले आहे.
आयपीएलमधील सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज:
- युझवेंद्र चहल: 224 बळी
- भुवनेश्वर कुमार: 200 बळी
- सुनील नरेन: 193 बळी
- पियुष चावला: 192 बळी
- रविचंद्रन अश्विन: 187 बळी
रसीबीचा मोठा विजय
भुवनेश्वरच्या विक्रमासोबतच आरसीबीने या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने या हंगामातील सर्वोच्च 250 धावांचा डोंगर उभा केला होता.
आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने 41 धावांत 3 बळी घेतले, तर कृणाल पांड्या आणि अभिनंदन सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
देवदत्त पदिक्कल (50), फिलिप सॉल्ट (46) यांनी चांगली सुरुवात केली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार (48) आणि टिम डेव्हिड (70) यांनी शेवटच्या 36 चेंडूत 99 धावा कुटल्या. 251 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 19.4 ओव्हर्समध्ये 207 धावांवर आटोपला. सर्फराज खानने 50 आणि प्रशांत वीरने 43 धावा केल्या.
हे देखील वाचा –











