Home / लेख / MPSC Group B Recruitment 2026: स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एमपीएससी ‘गट-ब’ संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 552 जागांसाठी होणार भरती

MPSC Group B Recruitment 2026: स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एमपीएससी ‘गट-ब’ संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; 552 जागांसाठी होणार भरती

MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे....

By: Team Navakal
MPSC Group B Recruitment 2026
Social + WhatsApp CTA

MPSC Group B Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरापासून या जाहिरातीची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या भरती प्रक्रियेद्वारे सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांसारखी महत्त्वाची पदे भरली जाणार आहेत.

परीक्षा आणि रिक्त जागांचा तपशील

  • एकूण पदे: ५५२ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
  • परीक्षेचा दिनांक: रविवार, १४ जून २०२६ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर ही पूर्व परीक्षा घेतली जाईल.
  • पदे: सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI).

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

उमेदवारांनी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे:

  1. अर्ज सुरू होण्याची तारीख: १० एप्रिल २०२६.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२६.
  3. ऑनलाईन शुल्क भरण्याची मुदत: ३० एप्रिल २०२६.
  4. चलनाद्वारे शुल्क भरण्याची अंतिम तारीख: २ मे २०२६.

रिक्त जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता

आयोगाने स्पष्ट केले आहे की, जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत जी मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत, त्यांचा समावेश यात करण्यात आला आहे. मात्र, पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत जर इतर विभागांकडून अतिरिक्त मागणीपत्रे प्राप्त झाली, तर रिक्त जागांच्या संख्येत वाढ होऊ शकते. तशी सुधारित माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

शासकीय स्तरावर कार्यवाहीला वेग

प्रशासकीय विभागांकडून मागणीपत्रे मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी नुकतीच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती. मागणीपत्रांना विलंब झाल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. सरकारच्या या कडक भूमिकेमुळेच प्रलंबित भरती प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.

उमेदवारांनी अधिकृत माहिती आणि सविस्तर अटींसाठी ‘एमपीएससी’च्या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि वेळेत आपला अर्ज सादर करावा.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या