Home / महाराष्ट्र / Rupali Chakankar : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: प्रतिभा चाकणकर यांना पोलिसांची नोटीस; २.४० कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा उलगडा होणार?

Rupali Chakankar : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण: प्रतिभा चाकणकर यांना पोलिसांची नोटीस; २.४० कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा उलगडा होणार?

Rupali Chakankar : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक पदर उलगडत असून,...

By: Team Navakal
Rupali Chakankar
Social + WhatsApp CTA

Rupali Chakankar : नाशिकमधील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे एकामागून एक पदर उलगडत असून, या प्रकरणाची व्याप्ती आता राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली असून, त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. ‘समता पतसंस्थे’तील अत्यंत संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

पतसंस्थेतील कोटींचे व्यवहार आणि पोलिसांचा संशय
शिर्डीत अशोक खरात विरुद्ध बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना ‘समता पतसंस्थेत’ खरातशी संबंधित अनेक संशयास्पद खात्यांची माहिती मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या पुत्रांच्या नावे या पतसंस्थेत एकूण ४ खाती असून, त्यावरून गेल्या काही काळात तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचे अवाढव्य व्यवहार झाले आहेत. खरातच्या बेकायदेशीर सावकारी व्यवसायातून जमा झालेला पैसा या खात्यांच्या माध्यमातून वळवण्यात आला का? आणि या अवाढव्य रकमांचे मूळ स्रोत काय आहेत? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पाच दिवसांची मुदत आणि चौकशीचा ससेमिरा
शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन वेगवेगळ्या निवासस्थानांच्या पत्त्यांवर ही नोटीस पाठवली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून पाच दिवसांच्या आत त्यांना शिर्डी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून आपला जबाब नोंदवणे बंधनकारक आहे. यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित ३३ अन्य खातेदारांचे जबाब नोंदवले असून, प्रतिभा चाकणकर यांची चौकशी या संपूर्ण तपासाला एक नवी दिशा देणारी ठरू शकते. खरातने पतसंस्थांच्या जाळ्याचा वापर करून ‘काळा पैसा’ पांढरा (Money Laundering) केल्याचा दाट संशय तपासी यंत्रणेला आहे.

खरातच्या कोठडीत वाढ आणि विळखा घट्ट
दुसरीकडे, नाशिकमध्ये विशेष तपास पथकाने (SIT) अशोक खरातला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या पोलीस कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खरातवर आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यांत १२ गंभीर गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी आता तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला आहे. एका गरोदर महिलेला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढून, तिला प्रसूती सुलभ होण्याचे आणि पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा अत्यंत संतापजनक आणि अघोरी प्रकार या गुन्ह्यातून समोर आला आहे.

राजकीय क्षेत्रावर परिणाम आणि पुढील वळण
अशोक खरातच्या या प्रकरणाचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत. यापूर्वीच खरातशी कथित जवळीक असल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना आपल्या पदांचे त्यागपत्र द्यावे लागले होते. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्याची चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणातील राजकीय धागेदोरे अधिक स्पष्ट होत आहेत. खरातने ‘जगदंब’ आणि ‘समता’ अशा विविध पतसंस्थांमध्ये स्वतःला नॉमिनी ठेवून शेकडो खाती उघडल्याचे निष्पन्न झाले आहे. या आर्थिक गैरव्यवहाराचे आणि शोषणाचे हे महाजाल नेमके कोठपर्यंत पसरले आहे, याचे सत्य आता पोलीस चौकशीतून बाहेर येणे अपेक्षित आहे

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या