Home / महाराष्ट्र / Vande Bharat Sleeper: अवघ्या 14 तासांत पुणे ते बेंगळुरू! वंदे भारत स्लीपरला मंजुरी; असा असेल प्रवासाचा प्लॅन

Vande Bharat Sleeper: अवघ्या 14 तासांत पुणे ते बेंगळुरू! वंदे भारत स्लीपरला मंजुरी; असा असेल प्रवासाचा प्लॅन

Vande Bharat Sleeper: मुंबई आणि बेंगळुरू या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई...

By: Team Navakal
Vande Bharat Sleeper
Social + WhatsApp CTA

Vande Bharat Sleeper: मुंबई आणि बेंगळुरू या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई (CSMT) ते बेंगळुरू (KSR) दरम्यान नवीन ‘वंदे भारत’ स्लीपर रेल्वे सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांना पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. या नवीन सेवेमुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि आयटी हब बेंगळुरू यांमधील अंतर आता अधिक वेगाने कापता येणार आहे.

पुणे ते बेंगळुरू प्रवासाचा वेळ वाचणार

सध्या पुणे आणि बेंगळुरू दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना साधारणपणे 15 ते 24 तासांचा वेळ लागतो. मात्र, नवीन वंदे भारत स्लीपरमुळे हा प्रवास अवघ्या 14 तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरांमधील साधारण 938 ते 1,025 किमीचे अंतर ही रेल्वे वेगाने पार करेल.

सध्याच्या आणि नवीन सेवेतील फरक:

  • कमी वेळ: सध्या त्रिवेंद्रम एक्सप्रेस सर्वात कमी वेळ (14 तास 59 मिनिटे) घेते, पण ती ठराविक दिवशीच धावते. वंदे भारतमुळे प्रवाशांना नियमित आणि वेगवान पर्याय मिळेल.
  • आरामदायी प्रवास: सध्या उद्यान एक्सप्रेस हा प्रवाशांचा आवडता पर्याय आहे, मात्र वंदे भारत स्लीपरमध्ये आधुनिक सोयीसुविधा आणि दर्जेदार आसनव्यवस्था असेल.

तिकिटाचे दर किती असतील?

अधिकृत भाडे अद्याप जाहीर झाले नसले तरी, सध्या सुरू असलेल्या वंदे भारत स्लीपरच्या धर्तीवर प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे:

  1. AC 3-Tier: अंदाजे 2,500 रुपये.
  2. AC First Class: अंदाजे 3,900 रुपये.

पुणे रेल्वे विभागाची भूमिका

पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अद्याप रेल्वे बोर्डाकडून या संदर्भात अधिकृत सूचना मिळालेल्या नाहीत. रेल्वेचे वेळापत्रक, थांबे आणि प्रत्यक्ष धावण्याची तारीख याबद्दलची माहिती लवकरच स्पष्ट होईल. ही ट्रेन मुंबईहून सुटून पुण्यामार्गे बेंगळुरूला जाणार असल्याने पुणेकरांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे.

बेंगळुरूमध्ये केएसआर बेंगळुरू, यशवंतपूर आणि कृष्णराजपुरम अशा विविध स्थानकांवरून ही सेवा कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या सेवेच्या प्रारंभामुळे उद्योजक, आयटी कर्मचारी आणि पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या