Home / क्रीडा / IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरला मोठा फटका! डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने BCCI कडून ‘इतक्या’ लाखांचा दंड

IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरला मोठा फटका! डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याने BCCI कडून ‘इतक्या’ लाखांचा दंड

Rajasthan Royals Team Manager Fined: आयपीएल 2026 मध्ये शिस्तीचा बडगा उगारत बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंदर यांच्यावर दंडात्मक...

By: Team Navakal
Rajasthan Royals Team Manager Fined
Social + WhatsApp CTA

Rajasthan Royals Team Manager Fined: आयपीएल 2026 मध्ये शिस्तीचा बडगा उगारत बीसीसीआयने राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंदर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. 10 एप्रिल रोजी गुवाहाटी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल त्यांना 1 लाख रुपयांचा दंड आणि अधिकृत ताकीद देण्यात आली आहे.

Rajasthan Royals Team Manager Fined: नेमकी चूक काय झाली?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोमी भिंदर हे डगआउटमध्ये मोबाईल वापरताना दिसत होते. आयपीएलच्या कडक नियमांनुसार, खेळाडू आणि संघ अधिकारी ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरू शकतात, मात्र डगआउटमध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. या घटनेनंतर 12 एप्रिल रोजी त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आणि 48 तासांत उत्तर देण्यास सांगितले होते.

Rajasthan Royals Team Manager Fined: बीसीसीआयचे समाधान झाले नाही

रोमी भिंदर यांनी त्यांचे उत्तर वेळेत सादर केले, परंतु बीसीसीआयचे सचिव देवाजित सैकिया यांनी सांगितले की, भ्रष्टाचारविरोधी पथकाला त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक वाटले नाही. “रोमी भिंदर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. ही त्यांची पहिलीच चूक असल्याने १ लाख रुपयांचा दंड आणि कडक ताकीद देऊन हे प्रकरण सध्या थांबवण्यात आले आहे,” असे सैकिया यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी ही कारवाई इतर संबंधितांसाठी एक इशारा असल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे.

रोमी भिंदर यांचा आयपीएलमधील प्रवास

रोमी भिंदर हे 2008 पासून म्हणजेच आयपीएलच्या पहिल्या सीझनपासून राजस्थान रॉयल्सशी जोडलेले आहेत. जेव्हा राजस्थानच्या संघावर बंदी होती, तेव्हा त्यांनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स सोबतही काम केले होते. दीर्घ अनुभव असूनही त्यांच्याकडून झालेल्या या चुकीमुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असून, रविवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे.

हे देखील वाचा –

Strait of Hormuz Fully Open : जगाला मोठा दिलासा! इराणकडून ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पूर्णपणे खुली; कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

 Women’s Reservation Bill: बाजूने मते जास्त तरीही महिला आरक्षण विधेयक का फेटाळले? समजून घ्या संसदेतील ‘विशेष बहुमताचे’ गणित

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या