Home / क्रीडा / Rashid Khan: भारताने दिली होती नागरिकत्वाची ऑफर! राशिद खानने का नाकारला प्रस्ताव? पुस्तकातून मोठा खुलासा

Rashid Khan: भारताने दिली होती नागरिकत्वाची ऑफर! राशिद खानने का नाकारला प्रस्ताव? पुस्तकातून मोठा खुलासा

Rashid Khan: अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान याने आपल्या आगामी पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट्स...

By: Team Navakal
Rashid Khan
Social + WhatsApp CTA

Rashid Khan: अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान याने आपल्या आगामी पुस्तकात एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ या पुस्तकात त्याने सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांनी त्याला नागरिकत्व देण्याची आणि त्यांच्या देशाकडून क्रिकेट खेळण्याची ऑफर दिली होती. मात्र, आपल्या मायदेशाशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्याने ही मोठी ऑफर फेटाळून लावली.

भारताने दिलेली ‘ती’ ऑफर

राशिद खानने पुस्तकात 2023 मधील आयपीएल (IPL) दरम्यानचा एक प्रसंग सांगितला आहे. तेव्हा तो गुजरात टायटन्सकडून खेळत होता. भारतीय क्रिकेट बोर्डातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने त्याची भेट घेतली आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहता त्याला भारतात राहण्याचा सल्ला दिला.

त्याला म्हटले की, “तुमच्या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. तुम्ही भारतात या, आम्ही तुम्हाला सर्व कागदपत्रे देऊ आणि तुम्ही इथूनच क्रिकेट खेळा.” राशिदने यावर उत्तर देताना म्हटले, “तुमच्या प्रेमाबद्दल खूप आभार, पण मी माझ्या अफगाणिस्तान देशासाठीच खेळणार.”

सुषमा स्वराज यांनीही दिले होते उत्तर

यापूर्वी 2018 मध्ये जेव्हा राशिदने सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना कोलकाताविरुद्ध वादळी खेळी केली होती, तेव्हा भारतीय चाहत्यांनी त्याला भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी सोशल मीडियावर लावून धरली होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी स्पष्ट केले होते की, राशिद हा आमच्या देशाचा अभिमान आहे आणि आम्ही त्याला कोणालाही देणार नाही.

अफगाणिस्तानशी एकनिष्ठ

27 वर्षांचा राशिद खान आज जगातील सर्वात महागडा टी-20 खेळाडू आहे. नांगरहारच्या गल्लीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज आयसीसी (ICC) ‘प्लेअर ऑफ द डिकेड’पर्यंत पोहोचला आहे. अनेक संधी असूनही त्याने आपल्या देशाची साथ न सोडण्याचा घेतलेला निर्णय सध्या क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या