Home / महाराष्ट्र / Mumbai Traffic Viral Video: ‘इथून चालते व्हा!’ मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा केल्याने महिलेने भाजपच्या मंत्र्यांना भररस्त्यात झापले; पाहा व्हिडिओ

Mumbai Traffic Viral Video: ‘इथून चालते व्हा!’ मुंबईत ट्रॅफिकचा खोळंबा केल्याने महिलेने भाजपच्या मंत्र्यांना भररस्त्यात झापले; पाहा व्हिडिओ

Mumbai Traffic Viral Video: मुंबईत काढण्यात आलेल्या एका आंदोलनाच्या मोर्चाने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण केली. मात्र, राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी सर्वसामान्य...

By: Team Navakal
Mumbai Traffic Viral Video
Social + WhatsApp CTA

Mumbai Traffic Viral Video: मुंबईत काढण्यात आलेल्या एका आंदोलनाच्या मोर्चाने शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण केली. मात्र, राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या नेत्यांना एका धाडसी महिलेने रस्त्यावरच चांगलेच सुनावले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून मुंबईकरांच्या संतापाला वाचा फोडली जात आहे.

नेमका प्रकार काय?

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले गेल्याच्या निषेधार्थ वरळी येथील डोमवर भाजपचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनामुळे वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. शेकडो लोक गाड्यांमध्ये अडकून पडले होते. याच दरम्यान, एका संतप्त महिलेने थेट भाजप आमदार गिरीश महाजन यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला.

“तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते रिकाम्या मैदानात जाऊन बोला, इथून बाजूला व्हा! रस्ता अडवू नका. तिथे मैदान रिकामे असताना तुम्ही शेकडो लोकांना वाहतूक कोंडीत का अडवून ठेवले आहे?” अशा शब्दांत या महिलेने महाजन यांना झापले.

मैदानात जागा उपलब्ध असताना रस्त्यावर आंदोलन करून जनतेला त्रास का दिला जातो, असा रोकडा सवाल तिने उपस्थित केला.

राजकीय वातावरण तापले

या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, “केवळ नेत्यांना खूष करण्यासाठी लोकांना 3-3 तास वेठीस धरणे चुकीचे आहे. जेव्हा आंदोलनाचे कारण खोटे असते, तेव्हा लोक अशीच फजिती करतात.”

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही भाजपवर निशाणा साधला. “महिला आरक्षणाच्या नावाखाली खोटा प्रचार करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या धाडसी भगिनीने उघडा पाडला आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेतून खाली खेचतील,” अशी टीका त्यांनी केली.

काय आहे पार्श्वभूमी?

11 एप्रिल रोजी लोकसभेत 131 वे घटनादुरुस्ती विधेयक फेटाळले गेले. या विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत (326 मते) न मिळाल्याने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यावरूनच सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या