LIC Recruitment 2026: बँकिंग आणि वित्त क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC HFL) नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे. संस्थेमार्फत ‘ज्युनिअर असिस्टंट’ या पदासाठी देशभरात एकूण 180 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी यामध्ये 25 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
LIC Recruitment 2026: मिळणार आकर्षक वेतन आणि लाभ
निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 4.64 लाख ते 4.98 लाख रुपयांपर्यंतचे सीटीसी (CTC) पॅकेज दिले जाणार आहे. हे वेतन उमेदवाराच्या नियुक्तीच्या शहरावर अवलंबून असेल. पगारासोबतच जेवणाचे कूपन आणि इतर वैयक्तिक लाभही कर्मचाऱ्यांना मिळतील, ज्यामुळे ही एक उत्तम नोकरीची संधी मानली जात आहे.
LIC Recruitment 2026: पात्रतेचे निकष काय आहेत?
- शिक्षण: उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, मात्र पदवीला किमान 55% गुण असणे अनिवार्य आहे. संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. (पार्ट टाइम किंवा डिस्टन्स पदवीधारक या भरतीसाठी पात्र नाहीत).
- वयोमर्यादा: 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
LIC Recruitment 2026: निवड प्रक्रिया आणि परीक्षा शुल्क
या पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा जून 2026 च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. अर्जासाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये इतके शुल्क भरावे लागेल.
अर्जाचे वेळापत्रक
- अर्ज भरण्यास सुरुवात: 16 एप्रिल 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2026
इच्छुक उमेदवारांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.lichousing.com) भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा.
हे देखील वाचा –
Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा भीमपराक्रम! ख्रिस गेल आणि फिंचचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ मोडला










