Women’s T20 World Cup 2026: क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. 12 जून 2026 पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू होणाऱ्या आयसीसी महिला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत भारतीय महिला ब्रिगेडचे नेतृत्व अनुभवी हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे, तर स्टार फलंदाज स्मृती मानधना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.
Women’s T20 World Cup 2026: भारत विरुद्ध पाकिस्तान: हाय-व्होल्टेज लढतीने होणार सुरुवात
भारतीय संघाच्या मोहिमेची सुरुवात अत्यंत धमाकेदार होणार आहे. 14 जून रोजी बर्मिंगहॅम येथे भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी रंगणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे.
Women’s T20 World Cup 2026: विश्वचषकाचा थरार आणि वेळापत्रक
या स्पर्धेचा हा 10 वा हंगाम असून एकूण 12 संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहेत. एकूण 33 सामने खेळवले जातील आणि अंतिम लढत 5 जुलै 2026 रोजी पार पडेल.
The wait is over! ⌛
— BCCI Women (@BCCIWomen) May 2, 2026
🚨 Presenting #TeamIndia’s squad for the ICC Women’s T20 World Cup 2026 🇮🇳
Let's bring out the cheers for #WomenInBlue 🤩#T20WorldCup pic.twitter.com/vZTGtqeTZL
Women’s T20 World Cup 2026: टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने:
- 14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान
- 17 जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स
- 21 जून: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- 25 जून: भारत विरुद्ध बांगलादेश
- 28 जून: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
पहिल्या टी-20 जेतेपदाचे स्वप्न
2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर, भारतीय महिला संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता टीम इंडियाचे मुख्य लक्ष पहिले टी-20 विश्वचषक जिंकण्यावर आहे. आजवर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 6 वेळा या चषकावर नाव कोरले आहे, तर इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडने प्रत्येकी एकदा हे जेतेपद मिळवले आहे.
Women’s T20 World Cup 2026: विश्वचषकासाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील, राधा यादव.
स्पर्धेतील दोन गट:
गट ब: इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, स्कॉटलंड, आयर्लंड.
गट अ: भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड्स.
हे देखील वाचा –











