Home / राजकीय / Assam Election Result 2026 : हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम! आसाममध्ये विरोधकांचा सुपडा साफ; वाचा जलुकबारी ते दलगावपर्यंतचा संपूर्ण निकाल….

Assam Election Result 2026 : हिमंत बिस्वा सरमांचा करिष्मा कायम! आसाममध्ये विरोधकांचा सुपडा साफ; वाचा जलुकबारी ते दलगावपर्यंतचा संपूर्ण निकाल….

Assam Election Result 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चित्र अधिकच रंगतदार बनले असून विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा...

By: Team Navakal
Assam Election Result 2026
Social + WhatsApp CTA

Assam Election Result 2026 : आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय चित्र अधिकच रंगतदार बनले असून विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. “असम में फिर हिमंता सरकार…” अशी चर्चा रंगू लागली असून काँग्रेसचे गौरव गोगोई तसेच एआययूडीएफचे बदरुद्दीन अजमल यांचा प्रभाव अपेक्षेप्रमाणे दिसून न आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राज्यात ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून या निवडणुकीत मुख्य लढत एनडीए आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी यांच्यात होती.

भाजपने आसाम गण परिषद (एजीपी) आणि युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवली, तर काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ) आणि इतर काही पक्षांसह आघाडी उभारली होती. निवडणूक प्रचारादरम्यान बांगलादेशी घुसखोरी, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राज्यातील पूरस्थिती, बेरोजगारी, चहाच्या मळ्यांतील कामगारांचे प्रश्न तसेच विकासाचे मुद्दे विशेषत्वाने चर्चेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी राज्यात जाहीर सभांचा धडाका लावत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झाले असून सुमारे ८५.९६ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला, जे २०२१ च्या तुलनेत किंचित जास्त आहे. २५ दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत मतदारांपैकी मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानात सहभाग घेतल्यामुळे निकालांवर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतरची ही पहिली मोठी निवडणूक असल्याने नवीन सीमारेषा, लोकसंख्येतील बदल आणि घुसखोरीसारख्या संवेदनशील मुद्द्यांमुळे मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचे निरीक्षण आहे. एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार एनडीएला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून अनेक ठिकाणी त्यांनी निर्णायक वाढ केली असल्याचे संकेत आहेत. तथापि, काही मतदारसंघांमध्ये लढत अत्यंत अटीतटीची झाल्याचेही समोर येत आहे, त्यामुळे अंतिम निकालांपर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.

दरम्यान, काँग्रेस आघाडीनेही आपण दमदार कामगिरी केली असल्याचा दावा केला असून निकाल जाहीर होण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य सत्तास्थापनेसाठी पडद्यामागील चर्चांना सुरुवात झाल्याचीही चर्चा आहे. या निवडणुकीतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची वैयक्तिक प्रतिमा आणि नेतृत्वाची कसोटी. ते प्रथमच मुख्यमंत्रीपदासाठी थेट जनादेश मागत मैदानात उतरले असून जनतेचा कौल त्यांच्या बाजूने राहतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या कामकाजाची तुलना माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या कार्यकाळाशीही केली जात असून प्रशासनातील बदल, विकासाच्या गतीला मिळालेला वेग आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती या मुद्द्यांवर मतदारांनी आपला निर्णय नोंदवला आहे.एकूणच, उच्च मतदान, तीव्र प्रचार मोहीम आणि महत्त्वाच्या स्थानिक तसेच राष्ट्रीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही निवडणूक आसामच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या