Home / लेख / Amazon Sale 2026: Samsung गॅलेक्सी फोन्सच्या किमतीत मोठी घसरण; S26 Ultra आणि S25 Ultra वर मिळतेय बंपर सवलत; ऑफर एकदा पाहाच

Amazon Sale 2026: Samsung गॅलेक्सी फोन्सच्या किमतीत मोठी घसरण; S26 Ultra आणि S25 Ultra वर मिळतेय बंपर सवलत; ऑफर एकदा पाहाच

Amazon Sale 2026: सॅमसंग (Samsung) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! ॲमेझॉनवर सुरू असलेल्या Great Summer Sale मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप सरीजसह बजेट...

By: Team Navakal
Amazon Sale 2026
Social + WhatsApp CTA

Amazon Sale 2026: सॅमसंग (Samsung) प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! ॲमेझॉनवर सुरू असलेल्या Great Summer Sale मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप सरीजसह बजेट स्मार्टफोन्सच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. 8 मे पासून सुरू झालेला हा सेल 13 मे 2026 पर्यंत चालणार असून, यामध्ये ग्राहकांना बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा अतिरिक्त लाभही मिळत आहे.

Samsung Galaxy S26 Ultra: लाँच नंतरचा पहिला मोठा डिस्काउंट

सॅमसंगचा नुकताच लाँच झालेला सर्वात शक्तिशाली फोन Galaxy S26 Ultra आता स्वस्त झाला आहे.

  • लाँच प्राईस: 1,39,999 रुपये.
  • सेल मधील किंमत: 1,30,999 रुपये. या सेलमध्ये हा फोन लाँचिंग किमतीपेक्षा तब्बल 9,000 रुपये स्वस्त मिळत आहे. याशिवाय कूपन आणि बँक कार्ड वापरल्यास ही किंमत अजून कमी होऊ शकते.

Samsung Galaxy S25 Ultra: तब्बल 35,000 रुपयांची बचत

जर तुम्ही गेल्या वर्षीचा फ्लॅगशिप फोन घेण्याचा विचार करत असाल, तर हीच सर्वोत्तम वेळ आहे.

  • लाँच प्राईस: 1,29,999 रुपये.
  • सेल मधील किंमत: 94,999 रुपये. गॅलेक्सी S25 Ultra वर कंपनीने थेट 35,000 रुपयांची कपात केली आहे. या किमतीत हा फोन एक जबरदस्त ‘व्हॅल्यू फॉर मनी’ डील ठरत आहे.

Galaxy A आणि M सिरीजवरही ऑफर्सचा पाऊस

फ्लॅगशिप मॉडेल्सशिवाय सॅमसंगच्या लोकप्रिय मध्यम श्रेणीतील (Mid-range) फोन्सवरही भरघोस सवलत दिली जात आहे:

  1. Galaxy A56: हा फोन आता 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
  2. Galaxy M56: हा फोन 33,999 रुपयांना लाँच झाला होता, मात्र सेलमध्ये तो केवळ 21,999 रुपयांत मिळत आहे (12,000 रुपयांची थेट सूट).
  3. Galaxy M36: 26,999 रुपयांचा हा फोन आता फक्त 18,999 रुपयांना घरी नेता येईल.

अतिरिक्त लाभ

किंमतीतील कपातीसोबतच ग्राहकांना एसबीआय (SBI) किंवा आयसीआयसीआय (ICICI) बँक कार्ड्सवर इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. तसेच तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही अधिक सवलत मिळवू शकता. सॅमसंगचे हे फोन्स प्रीमियम डिझाइन, उत्कृष्ट कॅमेरा आणि दमदार प्रोसेसरसाठी ओळखले जातात.

हे देखील वाचा – UFO Disclosure: एलियन्सचे अस्तित्व सिद्ध होणार? अमेरिकेकडून UFO संबंधित हजारो फाईल्स सार्वजनिक

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या