Home / देश-विदेश / NASA’s Apollo missions : परग्रहांवर खरेच एलियन आहेत? अमेरिकेने प्रथमच अहवाल दिला

NASA’s Apollo missions : परग्रहांवर खरेच एलियन आहेत? अमेरिकेने प्रथमच अहवाल दिला

NASA’s Apollo missions : नासाच्या अपोलो चांद्रमोहिमेच्या वेळी अंतराळवीरांना चंद्रावर अनेक रहस्यमय वस्तू आणि उडत्या तबकड्या दिसल्या होत्या, अशी चर्चा...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

NASA’s Apollo missions : नासाच्या अपोलो चांद्रमोहिमेच्या वेळी अंतराळवीरांना चंद्रावर अनेक रहस्यमय वस्तू आणि  उडत्या तबकड्या दिसल्या होत्या, अशी चर्चा गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. आता अमेरिकेकडून अधिकृतरित्या या संदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली आहे. उडत्या तबकड्यांसंदर्भातील सिक्रेट फाइलचा पहिला भाग अमेरिकेत काल जाहीर केला. ट्रम्प प्रशासनाने शेकडो नवे व्हिडिओ, फोटो आणि जुने सरकारी दस्तऐवज सार्वजनिक केले. या फाइल्समध्ये नासाच्या अपोलो मोहिमांशी संबंधित छायाचित्रे आणि अंतराळवीरांचे संभाषण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परग्रहवासी आणि उडत्या तबकड्यावर नव्याने चर्चा होऊ लागली आहे.


ट्रम्प प्रशासनाकडून  जाहीर करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये नासाच्या अपोलो 12 आणि अपोलो 17 मोहिमांशी संबंधित फोटो आणि संभाषणांचे रेकॉर्डिंग आहेत. एका छायाचित्रात चंद्राच्या पृष्ठभागावरील आकाशात तीन रहस्यमय बिंदू दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अपोलो 17 मोहिमेच्या संभाषणाचा लेखाजोखा सर्वाधिक चर्चेत आला आहे. पेंटागॉनने जाहीर केलेल्या उडत्या तबकड्यांच्या फाइल्सनुसार, 1972 मधील अपोलो 17 मोहिमेतील अंतराळवीरांनी अवकाशात फटाक्यांसारखे चमकणारे रहस्यमय कण पाहिल्याचा दावा केला होता. चंद्र मोहिमेच्या संभाषणाच्या नोंदींमध्ये अंतराळयानाच्या बाहेर दिसलेल्या या अज्ञात घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

वैमानिक रोनाल्ड इव्हान्स यांनी संभाषणात म्हटले होते की, आम्ही अंतराळयान वळवत असताना काही अतिशय चमकदार कण किंवा तुकडे आमच्या जवळून तरंगताना दिसत आहेत. त्यानंतर वैमानिक हॅरिसन श्मिट यांनी सांगितले, माझ्या खिडकीबाहेर अनेक मोठ्या चमकदार वस्तू दिसत आहेत जणू 4 जुलैची (अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन) फटाक्यांची आतषबाजी दिसत आहे. या मोहिमेदरम्यान घेतलेल्या एका छायाचित्रात चंद्राच्या पृष्ठभागावर त्रिकोणी आकारात तरंगणारे तीन बिंदू दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे छायाचित्र यापूर्वीही सार्वजनिक झाले होते, मात्र ते शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या दस्तऐवजांमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले. पेंटागॉनने छायाचित्रासोबत दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या रहस्यमय दृश्याचे नेमके स्वरूप काय आहे याबाबत अद्याप एकमत नाही. मात्र अमेरिकन सरकारच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, हे दृश्य प्रत्यक्षातील एखाद्या वस्तूमुळे निर्माण झाले असण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने काल उडत्या तबकड्या फाइल्ससाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू 162 दस्तऐवज सार्वजनिक केले.

या फाइल्समध्ये अपोलो 12 मोहिमेदरम्यान चंद्राजवळ दिसलेल्या पाच अज्ञात घटनांचे छायाचित्रही समाविष्ट आहे. तसेच 1965 मधील जेमिनी-7 मोहिमेतील एका अंतराळवीराच्या संभाषणाची नोंदही जाहीर करण्यात आली आहे. त्यात त्यांनी अवकाशात वाहनाच्या मागे राहणार्‍या मार्गासारखी दिसणारी एक अज्ञात वस्तू पाहिल्याचा उल्लेख केला आहे. पेंटागॉन अनेक वर्षांपासून उडत्या तबकड्या संदर्भातील दस्तऐवज गोपनीयतेतून बाहेर काढण्याचे काम करत आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या