Home / News / Congress stabbed DMK – PM Modi Slams!Explosives Found on Bengaluru Route : काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला! पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल ! बंगळूरूमध्ये पंतप्रधानांच्या मार्गावर स्फोटके

Congress stabbed DMK – PM Modi Slams!Explosives Found on Bengaluru Route : काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला! पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल ! बंगळूरूमध्ये पंतप्रधानांच्या मार्गावर स्फोटके

Congress stabbed DMK – PM Modi Slams – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या तीन राज्यांच्या दौऱ्याची सुरुवात आज कर्नाटकातून केली....

By: Team Navakal
Congress stabbed DMK - PM Modi Slams
Social + WhatsApp CTA

Congress stabbed DMK – PM Modi Slams – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या तीन राज्यांच्या दौऱ्याची सुरुवात आज कर्नाटकातून केली. ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या ४५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी ‘ध्यान मंदिरा’चे उद्घाटन करून जनसभेला संबोधित केले. आपल्या भाषणात तामिळनाडूमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी आरोप केला की, काँग्रेसने द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला.

नरेंद्र मोदी म्हणाले की,काँग्रेस आणि द्रमुक यांच्यात गेल्या २५-३० वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. डीएमकेने अनेक वेळा काँग्रेसला संकटातून बाहेर काढले. २०१४ पूर्वी केंद्रात १० वर्षे चाललेले काँग्रेस सरकारही द्रमुकच्या पाठिंब्यामुळेच टिकून राहिले. द्रमुकने नेहमी काँग्रेसच्या हितासाठी काम केले पण सत्तेचे समीकरण बदलताच काँग्रेसने पहिल्याच संधीवर द्रमुकच्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेस हा परजीवी पक्ष बनला आहे. सत्तेसाठी तो कोणालाही सोडू शकतो. असा एकही पक्ष नाही, ज्याच्या पाठीत काँग्रेसने खंजीर खुपसला नाही. यूपीए-१ आणि यूपीए-२ च्या काळात द्रमुकने काँग्रेसला अनेक वेळा संकटातून बाहेर काढले होते. पण आता राजकीय वारे बदलल्यानंतर त्यांचाच विश्वासघात केला.

यावेळी कर्नाटकमधील काँग्रेसच्या सराकारवरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात लोकांच्या समस्या सोडवण्याऐवजी सरकारने आपला बहुतेक वेळ अंतर्गत संघर्ष सोडवण्यात घालवला आहे. मुख्यमंत्री किती काळ पदावर राहतील हे काँग्रेस ठरवू शकत नाही. दुसऱ्याला संधी द्यायची की नाही, हेही ठरत नाही. सर्व काही अधांतरी आहे. काँग्रेसला फक्त लोकांचा विश्वासघात कसा करायचा हेच माहीत आहे. ते स्वतः खोटे आहेत आणि त्यांची आश्वासनेही खोटी देत आहेत.

कर्नाटकचा दौरा आटपून मोदी दुपारी तेलंगणाला रवाना झाले. हैदराबादमध्ये सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून संध्याकाळी ते गुजरातला गेले. रात्री जामनगरमध्ये मुक्काम केल्यानंतर उद्या ते सोमनाथ मंदिरातील ‘सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी होणार आहेत. बडोद्यात ते सरदारधाम हॉस्टेलचे उद्घाटन करून जनसभेलाही संबोधित करणार आहेत.

बंगळूरूमध्ये पंतप्रधानांच्या मार्गावर स्फोटके

बंगळूरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्याच्या मार्गावर आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळील थाथागुनी येतील कनकपुरा रोड परिसरात जिलेटिनच्या कांड्या म्हणजेच स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली.एका अज्ञात व्यक्तीने फोन करून एचएएल विमानतळ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राजवळ स्फोट होणार असल्याची धमकी दिली होती.त्यानुसार पंतप्रधानांचा ताफा त्या मार्गावरून जाण्यापूर्वीच पोलिसांनी ती जप्त केली.त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवत कोरामंगला येथून संशयिताला ताब्यात घेतले. तपासात संबंधित व्यक्तीने यापूर्वीही व्हीआयपी दौऱ्यांवेळी अशाच धमक्या दिल्याचे उघड झाले.

Web Title:
संबंधित बातम्या