Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar: केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026’ साठी अधिकृतपणे नावनोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या मुलांनी आपल्या लहान वयात अफाट साहस, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर देशात आपली ओळख निर्माण केली आहे, त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले जाते. अशा मुलांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना भविष्यासाठी अधिक प्रोत्साहित करणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : पुरस्कारासाठी कोणाची निवड होते?
हा पुरस्कार अशा मुलां दिला जातो ज्यांनी विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील क्षेत्रांचा समावेश होतो:
- वीरता (धाडस)
- क्रीडा (खेळ)
- समाजसेवा
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- पर्यावरण
- कला आणि संस्कृती
पात्रता: भारताचा कोणताही नागरिक असलेला मुलगा किंवा मुलगी यासाठी अर्ज करू शकतात. 31 जुलै 2026 पर्यंत या मुलांचे वय किमान 5 वर्षे आणि जास्तीत जास्त 18 वर्षे असणे अनिवार्य आहे.
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : अर्ज कसा आणि कुठे करायचा?
या पुरस्कारासाठी अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.
- इच्छुक मुले किंवा त्यांचे पालक केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टल https://awards.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : निवड प्रक्रिया आणि गौरव
महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत स्थापन केलेली विशेष समिती या पुरस्कारांसाठी पात्र मुलांची निवड करते. मुलांच्या कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावरील प्रभाव लक्षात घेऊन ही निवड केली जाते. निवडक मुलांच्या नावांची घोषणा 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त केली जाईल. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित विशेष सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते या बालकांना सन्मानित करण्यात येईल.
मागील वर्षीचा आदर्श
गेल्या वर्षी बिहारच्या युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याला देखील या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात त्याने दाखवलेल्या आक्रमक खेळीमुळे त्याला हा बहुमान मिळाला होता. मागील वर्षी देशभरातील एकूण 20 बालकांना त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला होता.
हे देखील वाचा – PM Modi Appeal: इंधनाची बचत करा आणि वर्षभर सोनं खरेदी टाळा! पंतप्रधान मोदींचे देशाला मोठे आवाहन; पाहा नक्की असे का म्हणाले?










