Home / महाराष्ट्र / Nida Khan TCS Case : ७२ तासांचा अल्टिमेटम संपला आणि बुलडोजर फिरवला! निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांचं घर जमीनदोस्त.

Nida Khan TCS Case : ७२ तासांचा अल्टिमेटम संपला आणि बुलडोजर फिरवला! निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलांचं घर जमीनदोस्त.

Nida Khan TCS Case : नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मधील छळ आणि धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून सोडले...

By: Team Navakal
Nida Khan TCS Case
Social + WhatsApp CTA

Nida Khan TCS Case : नाशिक येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) मधील छळ आणि धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून सोडले असतानाच, यातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निदा खानला लपवून ठेवण्यास मदत केल्याचा ठपका असलेले एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत बांधकामावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज धडक कारवाई करत बुलडोजर चालवला.

मेणबत्त्यांच्या प्रकाशात लपली होती आरोपी-
नाशिक पोलिसांनी ७ मे रोजी विशेष मोहिमेद्वारे निदा खानला छत्रपती संभाजीनगर येथील मतीन पटेल यांच्या घरातून अटक केली होती. तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. निदा खान या घरात लपलेली असताना, शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना तिच्या वास्तव्याचा सुगावा लागू नये म्हणून घरातील विजेचा वापर पूर्णपणे टाळला जात होता. रात्रीच्या वेळी घरातील दिवे न लावता ती केवळ मेणबत्त्यांच्या प्रकाशात वास्तव्य करत होती. आज जेव्हा महानगरपालिकेचे अधिकारी कारवाईसाठी घराचा दरवाजा तोडून आत शिरले, तेव्हा त्यांना तिथे मोठ्या प्रमाणावर जळलेल्या मेणबत्त्या आढळून आल्या, ज्यावरून तिने अत्यंत गुप्तरीतीने तिथे आश्रय घेतल्याचे स्पष्ट झाले.

महानगरपालिकेची कठोर कारवाई-
मतीन पटेल यांनी निदा खानला ज्या घरात आश्रय दिला होता, ते बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी ९ मे रोजी प्रशासनाने ७२ तासांची नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आज ७२ तासांची मुदत संपताच महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हे बांधकाम जमीनदोस्त केले.

राष्ट्रीय महिला आयोगाचा गंभीर अहवाल-
या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगाने ५० पानांचा एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात निदा खानच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. निदा खान ही केवळ आरोपी नसून, जाळ्यात ओढलेल्या तरुणींना ‘धार्मिक शिकवण’ देऊन त्यांचे ब्रेनवॉश करण्यात तिचा मुख्य सहभाग होता, असे आयोगाने नमूद केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, टीसीएस कंपनीच्या अंतर्गत ‘पॉश’ (POSH) समितीने नाशिक युनिटला कधीही भेट दिली नसल्याचेही या अहवालातून उघड झाले आहे, ज्यामुळे कंपनी प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या