Home / देश-विदेश / PM Modi : बोले तैसे चाले! मोदींनी ताफा घटवला; पंतप्रधानांच्या ताफ्यात आता अवघ्या २ गाड्या; इंधन बचतीचा ‘दिल्ली’तून मोठा संदेश….

PM Modi : बोले तैसे चाले! मोदींनी ताफा घटवला; पंतप्रधानांच्या ताफ्यात आता अवघ्या २ गाड्या; इंधन बचतीचा ‘दिल्ली’तून मोठा संदेश….

PM Modi : जागतिक स्तरावर निर्माण झालेली अस्थिरता, ऊर्जेचे संकट आणि परकीय चलन साठ्यावर येणारा ताण लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र...

By: Team Navakal
PM Modi
Social + WhatsApp CTA

PM Modi : जागतिक स्तरावर निर्माण झालेली अस्थिरता, ऊर्जेचे संकट आणि परकीय चलन साठ्यावर येणारा ताण लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘इंधन बचती’चा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, केवळ उपदेश न देता पंतप्रधानांनी स्वतःपासूनच या बदलाची सुरुवात केली आहे. त्यांच्या ताफ्यात यापूर्वी सुरक्षेसाठी वाहनांची मोठी रांग असायची; मात्र आता इंधन बचतीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या केवळ दोनवर मर्यादित केली आहे. पंतप्रधानांच्या या पावलामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवर भर आणि एसपीजीची भूमिका-
पंतप्रधानांनी केवळ वाहनांची संख्याच कमी केली नाही, तर ताफ्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, नवीन वाहने खरेदी करून सरकारी तिजोरीवर भार टाकण्याऐवजी उपलब्ध संसाधनांचाच प्रभावी वापर करण्यावर त्यांनी भर दिला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’ने (SPG) या निर्देशांची अंमलबजावणी तातडीने सुरू केली आहे. ‘ब्लू बुक’मधील कडक सुरक्षा मानकांमध्ये कोणतीही तडजोड न करता ही कपात केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपशासित राज्यांमध्येही ‘काटकसर’ मोहिमेचे पडसाद-
पंतप्रधानांच्या या निर्णयाचे अनुकरण आता भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सुरू केले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवणे आणि इंधनाचा अपव्यय टाळणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.

जागतिक संकट आणि ‘राष्ट्रीय जबाबदारी’चे आवाहन-
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून ऊर्जा संकट ओढवले आहे. या कठीण परिस्थितीत भारताचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी रविवारी नागरिकांना संबोधित करताना “राष्ट्रीय जबाबदारी” पार पाडण्याचे आवाहन केले. प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर अवलंबून न राहता ‘स्थानिक उत्पादनांचा’ (Local for Global) वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सोन्याची खरेदी आणि परदेश पर्यटनावर मर्यादा-
परकीय चलनाची बचत करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना काही कठोर पण आवश्यक सल्ले दिले आहेत. पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळावी आणि परदेशातील ‘डेस्टिनेशन वेडिंग’ तसेच विदेशी पर्यटन टाळून देशांतर्गत पर्यटनाला (Domestic Tourism) चालना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या