Home / देश-विदेश / Prateek Yadav : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव; जखमांच्या खुणा आणि ‘फॉरेन्सिक’ निष्कर्षांमुळे घातपाताचा संशय बळावला

Prateek Yadav : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव; जखमांच्या खुणा आणि ‘फॉरेन्सिक’ निष्कर्षांमुळे घातपाताचा संशय बळावला

Prateek Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे बंधू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अपर्णा यादव यांचे पती...

By: Team Navakal
Prateek Yadav :
Social + WhatsApp CTA

Prateek Yadav : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांचे बंधू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव यांच्या निधनानंतर आता या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले आहे. १३ मे रोजी झालेल्या त्यांच्या मृत्यूभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले असून, हे प्रकरण आता थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगापर्यंत (NHRC) पोहोचले आहे. ‘डीके फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने या मृत्यूमागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवत, आयोगाकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

‘फिटनेस फ्रीक’ प्रतीक यांचा मृत्यू सामान्य की घातपात?
प्रतीक यादव हे राजकारणापासून अलिप्त राहून रिअल इस्टेटचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांची ओळख एक ‘फिटनेस फ्रीक’ (आरोग्याबद्दल अत्यंत जागरूक व्यक्ती) म्हणून होती. अशा तंदुरुस्त व्यक्तीचा अचानक मृत्यू होणे अनाकलनीय असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. १३ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले गेले होते, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, शवविच्छेदनानंतर २४ तासांहून अधिक काळ उलटल्यावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, ज्याने संशयाची सुई अधिक गडद केली आहे.

शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक खुलासे
डॉ. मौसमी सिंह यांच्या नेतृत्वाखालील तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलने प्रतीक यादव यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या अहवालानुसार:

मृत्यूचे तांत्रिक कारण: फुफ्फुसांच्या मुख्य नसेमध्ये रक्ताची मोठी गाठ (Blood clot) साकळल्यामुळे ‘मॅसिव्ह पल्मोनरी थ्रोम्बोम्बोलिझम’ झाला आणि परिणामी हृदय व श्वसनक्रिया अचानक बंद पडली (Cardiorespiratory Collapse).

शरीरावरील जखमा: पोस्टमार्टम दरम्यान त्यांच्या शरीरावर एकूण सहा जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यातील तीन जखमा ५ ते ७ दिवस जुन्या आहेत, तर उर्वरित तीन जखमा मृत्यूच्या केवळ एक दिवस आधीच्या आहेत. या जखमा प्रामुख्याने छाती, उजवा हात, कोपर आणि दोन्ही मनगटांवर दिसून आल्या आहेत.

मेंदूतील रक्तस्त्राव: तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या मेंदूमध्ये ‘सब-अॅराक्नोइड हॅमरेज’ (Sub-arachnoid hemorrhage) झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. हे सहसा डोक्याला बसलेल्या तीव्र दुखापतीमुळे होते, जे एखाद्या हिंसक शारीरिक संघर्षाकडे निर्देश करते.

वैद्यकीय इतिहास आणि तज्ज्ञांचे मत-
प्रतीक यादव यांच्यावर यापूर्वी मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना काही आठवड्यांपासून श्वसनाचा त्रास जाणवत होता, ज्यासाठी ते रक्त पातळ करणारी औषधे घेत होते. मात्र, केवळ प्राथमिक पोस्टमार्टम अहवालावरून अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असे फॉरेन्सिक तज्ज्ञ मीनाक्षी शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे. मृत्यूचे नेमके स्वरूप नैसर्गिक आहे की घातपाताचे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांचा व्हिसेरा (Viscera), हृदय आणि रक्ताचे नमुने पुढील रासायनिक आणि वैज्ञानिक तपासासाठी (Toxicology) सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

राजकीय पडसाद आणि पुढील तपास
सपा आमदार रविदास मेहरोत्रा यांनीही या मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी करत हा घातपाताचा प्रकार असू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. आता सर्वांचे लक्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालाकडे लागले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या