Maharashtra Agri Hackathon: महाराष्ट्रातील शेती क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि नवनवीन प्रयोगांना बळ देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘अॅग्री हॅकेथॉन’च्या धर्तीवर पुढील वर्षापासून संपूर्ण राज्य पातळीवर ‘महाराष्ट्र अॅग्री हॅकेथॉन’ स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विशेष म्हणजे, या राज्यस्तरीय स्पर्धेतील पहिला पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाणार आहे.
कृषी महाविद्यालयाच्या आवारात कृषी विभागाने आयोजित केलेल्या दुसऱ्या ‘पुणे अॅग्री हॅकेथॉन’च्या बक्षीस वितरण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
१८ नवकल्पनांना सरकारचे बळ; १२ प्रकल्प बाजारात आणणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शेती व्यवसाय फायदेशीर, शाश्वत आणि हायटेक करण्यासाठी नव्या संशोधनाची गरज आहे. पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील निवडक 18 उत्कृष्ट कल्पनांना पुढील टप्प्यात सरकारकडून विशेष मार्गदर्शन आणि मदत केली जाईल. यापैकी किमान 12 नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रत्यक्ष बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, या स्पर्धेची मूळ संकल्पना अजित पवार यांचीच होती.
पुणे अॅग्री हॅकेथॉन: विविध विभागांतील विजेते आणि उपविजेते पुढीलप्रमाणे:
1. मृदा आरोग्य व व्यवस्थापन
- विजेता: किसान साथी
- उपविजेता: नॅनो वीटा
2. स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
- विजेता: आयओएच अभियंता समूह
- उपविजेता: फार मोअर
3. कृषी यांत्रिकीकरण (AI आणि रोबोटिक्स)
- विजेता: एग्रीटेक नेक्सस
- उपविजेता: टीम व्हीएनएमकेव्ही
4. कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
- विजेता: विन विन बाईट्स
- उपविजेता: सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
5. अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
- विजेता: प्रोटो फीड्स
- उपविजेता: इको एक्सट्रॅक्ट
6. पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
- विजेता: स्मार्ट बायो डिलिव्हरी
- उपविजेता: कृषी नेत्र
7. हवामान अनुकूल व डिजिटल शेती
- विजेता: डीप अँग बॉट
- उपविजेता: मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
8. सॅटेलाईट व जीआयएस आधारित पीक सर्वेक्षण
- विजेता: क्रॉप जेन एआय
- उपविजेता: green माइंड्स
9. स्मार्ट कृषी प्रशासनासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI)
- विजेता: ई-पिक ऑडिट एआय
- उपविजेता: कृषी प्रबंध
हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा










