Home / क्रीडा / IPL Playoffs Qualification Scenarios: RCB नंतर प्लेऑफमध्ये कोण जाणार? ‘या’ संघांमध्ये चुरस; जाणून घ्या गणित

IPL Playoffs Qualification Scenarios: RCB नंतर प्लेऑफमध्ये कोण जाणार? ‘या’ संघांमध्ये चुरस; जाणून घ्या गणित

IPL Playoffs Qualification Scenarios: आयपीएल 2026 च्या साखळी फेरीतील शेवटचे केवळ 8 सामने शिल्लक राहिले असून प्लेऑफची शर्यत आता एका...

By: Team Navakal
IPL Playoffs Qualification Scenarios: RCB नंतर प्लेऑफमध्ये कोण जाणार? 'या' संघांमध्ये चुरस; जाणून घ्या गणित
Social + WhatsApp CTA

IPL Playoffs Qualification Scenarios: आयपीएल 2026 च्या साखळी फेरीतील शेवटचे केवळ 8 सामने शिल्लक राहिले असून प्लेऑफची शर्यत आता एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रंजक वळणावर पोहोचली आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडले आहेत, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिमाखात बाद फेरी गाठली आहे.

आता उर्वरित जागांसाठी ७ संघांमध्ये जोरदार चुरस असून गणितीय आकडेवारीनुसार प्रत्येक संघाची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची टक्केवारी समोर आली आहे.

सध्याच्या घडीला सामन्यांच्या निकालांचे असंख्य कोंबिनेशन्स उपलब्ध आहेत. या आकड्यांच्या खेळानुसार कोणत्या संघाची स्थिती कशी आहे, त्याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:

1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): 100% खात्री

बंगळुरूचा संघ आता पूर्णपणे सुरक्षित असून त्यांनी प्लेऑफचे तिकीट पक्के केले आहे. सर्व संभाव्य गणितांमध्ये आरसीबी गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरच राहील. त्यांचे सर्वात वाईट समीकरण असेल तर ते गुजरात आणि हैदराबादसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहू शकतात.

2. गुजरात टायटन्स (GT): उत्तम नेट रन रेटचा फायदा

गुजरातचा संघ गुणांच्या बाबतीत पहिल्या ४ मध्ये राहण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, तरीही ते प्लेऑफला मुकू शकतात़जर हैदराबाद, चेन्नई आणि राजस्थान यांच्यासोबत त्यांचे १६ गुणांवर टाय झाले, तरच ते बाहेर पडू शकतात. पण सध्या या चारही संघांमध्ये गुजरातचा नेट रन रेट सर्वात भारी आहे.

3. सनरायझर्स हैदराबाद (SRH): 87.9% संधी

हैदराबादचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे. पहिल्या ४ मध्ये स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता तब्बल 87.9% आहे. इतकेच नाही तर पहिल्या दोन क्रमांकावर राहण्याची त्यांची संधी 50% इतकी मजबूत आहे. इथून पुढे अत्यंत सुमार कामगिरी केली तरच हैदराबादचे गणित बिघडू शकते.

4. चेन्नई सुपर किंग्स (CSK): 44.9% संधी

चेन्नईचा प्रवास सध्या ५०-५० अशा स्थितीत आहे. पहिल्या ४ मध्ये राहण्याची त्यांची शक्यता 44.9% असून इतर २ किंवा ३ संघांसोबत दुसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे राहण्याची २५% संधी त्यांच्याकडे आहे.

5. राजस्थान रॉयल्स (RR): 44.5% संधी

रविवारच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सच्या अडचणी थोड्या वाढल्या आहेत. त्यांचे अव्वल ४ मधील स्थान पक्के होण्याची शक्यता आता 44.5% वर आली आहे. तसेच अव्वल दोन क्रमांकामध्ये संयुक्तपणे स्थान मिळवण्याची त्यांची शक्यता केवळ 9.4% उरली आहे.

6. पंजाब किंग्स (PBKS): 35.2% संधी

शेवटच्या सामन्यातील पराभवामुळे पंजाब किंग्सला मोठा फटका बसला आहे. त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता घसरून 35.2% झाली आहे. आता पंजाबचा संघ पहिल्या दोन स्थानांच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला असून केवळ तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानासाठीच प्रयत्न करू शकतो.

7. दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR): १५ ते २०% आशा

वीकेंडला मिळालेल्या विजयामुळे दिल्ली आणि कोलकाताने आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत, पण ते अजूनही इतर संघांपेक्षा मागे आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स: बाद फेरी गाठण्याची शक्यता केवळ 18% आहे. पंजाबप्रमाणेच हे दोन्ही संघ आता गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचू शकत नाहीत.

दिल्ली कॅपिटल्स: प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता 19.5% आहे.

हे देखील वाचा – Pune Dagdusheth Ganpati: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मिळाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या