Home / मनोरंजन / Mahima Chaudhry Daughter : महिमा चौधरीची लेक बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून करणार अभिनय क्षेत्रात डेब्यू? सोशल मीडियावरील ‘तो’ फोटो पाहून फॅन्स पुरते चक्रावले!

Mahima Chaudhry Daughter : महिमा चौधरीची लेक बॉलिवूड सोडून थेट अमेरिकन शोमधून करणार अभिनय क्षेत्रात डेब्यू? सोशल मीडियावरील ‘तो’ फोटो पाहून फॅन्स पुरते चक्रावले!

Mahima Chaudhry Daughter : नव्वदच्या दशकात आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरी आजही...

By: Team Navakal
Mahima Chaudhry Daughter
Social + WhatsApp CTA

Mahima Chaudhry Daughter : नव्वदच्या दशकात आपल्या निखळ सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘परदेस’ फेम अभिनेत्री महिमा चौधरी आजही चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या महिमाचा नुकताच बॉलिवूडमध्ये कमबॅकचा प्रयत्न झाला; मात्र तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. असे असतानाच, आता महिमाच्या सौंदर्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे, पण ती महिमामुळे नव्हे तर तिची मुलगी अरियाना चौधरी मुळे.

हॉलिवूड पदार्पणाच्या अफवा आणि ‘ऑफ कॅम्पस’ सीरिज-
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे की, अरियाना चौधरीने थेट हॉलिवूडमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील लोकप्रिय सीरिज ‘ऑफ कॅम्पस’ (Off Campus) मधील एका अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांनी असा अंदाज वर्तवला की, ही दुसरी तिसरी कोणी नसून महिमा चौधरीची मुलगी अरियानाच आहे. अनेकांनी तिला ‘ऑफ कॅम्पस’ची नवी नायिका म्हणून संबोधण्यासही सुरुवात केली.

साम्य शोधताना झालेली गल्लत-
‘ऑफ कॅम्पस’ ही सीरिज लेखिका एल. केनेडी यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित असून, १३ मे रोजी तिचा प्रीमियर झाला. या मालिकेत हॅना वेल्स आणि गॅरेट ग्रॅहम यांची महाविद्यालयीन प्रेमकथा गुंफण्यात आली आहे. या मालिकेतील ‘अॅली हेस’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री भारतीय प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे या अभिनेत्रीचे महिमा चौधरीशी असलेले विलक्षण साम्य.

महिमा चौधरीच्या तरुणपणीच्या रूपाची आठवण करून देणारी ही अभिनेत्री अरियाना चौधरी असल्याचा अनेकांचा समज झाला. मात्र, तपासाअंती असे स्पष्ट झाले आहे की, ती अभिनेत्री अरियाना नसून अमेरिकन अभिनेत्री मिका अब्दुल्ला (Mika Abdalla) आहे. मिका आणि अरियाना यांच्या चेहऱ्यातील साम्यामुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये हा संभ्रम निर्माण झाला.

कोण आहे मिका अब्दुल्ला?
मिका अब्दुल्ला ही एक नामांकित अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘ऑफ कॅम्पस’ या रोमँटिक ड्रामा सीरिजमध्ये तिने मुख्य नायिका हॅनाची जिवलग मैत्रीण आणि रूममेट ‘अॅली हेस’ची महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अमेरिकन महाविद्यालयीन जीवन, निखळ मैत्री आणि गुंतागुंतीचे प्रेमसंबंध यावर भाष्य करणाऱ्या या मालिकेत मिकाच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या मालिकेत बेलमाँट कॅमेली आणि एला ब्राइट यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

चाहत्यांच्या जुन्या आठवणी ताज्या-
मिका अब्दुल्लाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना महिमा चौधरीच्या ‘परदेस’ आणि ‘दाग : द फायर’ सारख्या चित्रपटांतील सौंदर्याची आठवण झाली. अरियाना चौधरी अद्याप अधिकृतपणे सिनेसृष्टीत आली नसली, तरी तिच्या नावाने व्हायरल झालेल्या या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या