Home / देश-विदेश / Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ! गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा झटका

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ! गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा झटका

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्य वाहनधारकांसाठी इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून शनिवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी...

By: Team Navakal
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ! गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा झटका
Social + WhatsApp CTA

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्य वाहनधारकांसाठी इंधन दरवाढीचे सत्र सुरूच असून शनिवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात 87 पैशांची तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या अवघ्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. हा वाढीव खर्चाचा बोजा आता सरकारी तेल कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. 15 मे पासून सुरू झालेल्या या दरवाढीमुळे आतापर्यंत इंधनाचे दर प्रति लिटर जवळपास 5 रुपयांनी महागले आहेत.

गेल्या 10 दिवसांतील दरवाढीचा आलेख

तेल कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत कशा प्रकारे किमती वाढवल्या आहेत, त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

  • 15 मे: पहिल्याच दिवशी थेट 3 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली.
  • 19 मे: दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात 90 पैशांची वाढ झाली.
  • 23 मे (शनिवार): आज पुन्हा पेट्रोल 87 पैसे आणि डिझेल 91 पैशांनी महागले.

या तीनही दरवाढी मिळून ग्राहकांना प्रति लिटर मागे तब्बल 5 रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.

प्रमुख महानगरांमधील पेट्रोलचे आजचे दर

देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीत झालेली वाढ आणि नवे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली: 99.51 रुपये (87 पैशांची वाढ)
  • मुंबई: 108.49 रुपये (90 पैशांची वाढ)
  • कोलकाता: 110.64 रुपये (94 पैशांची वाढ)
  • चेन्नई: 105.31 रुपये (82 पैशांची वाढ)

प्रमुख महानगरांमधील डिझेलचे आजचे दर

डिझेलच्या किमतीतही सर्वच शहरांमध्ये मोठी वाढ झाली असून नवे दर खालीलप्रमाणे आहेत:

  • दिल्ली: 92.49 रुपये (91 पैशांची वाढ)
  • मुंबई: 95.02 रुपये (94 पैशांची वाढ)
  • कोलकाता: 97.02 रुपये (95 पैशांची वाढ)
  • चेन्नई: 96.98 रुपये (87 पैशांची वाढ)

मध्य पूर्वेतील तणाव जोपर्यंत निवळत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वसामान्यांना आणखी काही दरवाढीचे झटके बसण्याची भीती वर्तवली जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या