Tulsi Gabbard Resigns: अमेरिकेच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत विश्वासू आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शुक्रवारी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या एका बैठकीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
येत्या 30 जून रोजी त्या आपल्या पदावरून अधिकृतपणे पायउतार होतील. गेल्या दीड वर्षांपासून त्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागाचे नेतृत्व करत होत्या. गॅबार्ड यांच्यानंतर प्रिन्सिपल डेप्युटी डायरेक्टर अॅरॉन लुकास हे या विभागाचे प्रभारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत.
Tulsi Gabbard Resigns: राजीनाम्यामागे ‘हे’ भावूक कारण
तुलसी गॅबार्ड यांनी आपल्या राजीनामा पत्रात कौटुंबिक आणि भावनिक कारणाचा उल्लेख केला आहे:
- पतीला दुर्मिळ कॅन्सर: गॅबार्ड यांचे पती अब्राहम यांना हाडांचा अत्यंत दुर्मिळ कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे.
- कठीण काळात सोबत राहण्याचा निर्णय: आमच्या 11 वर्षांच्या वैवाहिक जीवनात माझे पती माझी मोठी ताकद राहिले आहेत. आता त्यांच्या या कठीण काळात मला त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. अशा गंभीर परिस्थितीत मी माझ्या कर्तव्यावर राहून त्यांना एकटे सोडू शकत नाही, असे गॅबार्ड यांनी म्हटले आहे.
पडद्यामागील वेगळीच चर्चा: तुलसी गॅबार्ड यांनी कौटुंबिक कारणास्तव राजीनामा दिला असल्याचे सांगितले असले, तरी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हाईट हाऊसनेच त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Tulsi Gabbard Resigns: गॅबार्ड यांचा दीड वर्षांचा वादळी कार्यकाळ
43 वर्षांच्या तुलसी गॅबार्ड या अमेरिकेच्या संसदेत निवडून आलेल्या पहिल्या हिंदू महिला आहेत. त्यांचा कार्यकाळ अत्यंत प्रभावी आणि वादळी राहिला आहे. आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मोठे धाडसी निर्णय घेतले:
- मोठी आर्थिक कपात: त्यांनी गुप्तहेर यंत्रणेचा अवाजवी आकार कमी करत वार्षिक बजेटमध्ये तब्बल 700 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची कपात केली.
- गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या: त्यांनी सरकारी रेकॉर्डमधील 5 लाखाहून अधिक पानांची गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली. यामध्ये जॉन एफ. केनेडी आणि रॉबर्ट एफ. केनेडी यांच्या हत्येच्या फाईल्स, ट्रम्प-रशिया तपास आणि 2016 च्या निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाच्या फाईल्सचा समावेश होता.
Tulsi Gabbard Resigns: ट्रम्प यांच्या कॅबिनेटमधील गळती सुरूच
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळातून बाहेर पडणाऱ्या तुलसी गॅबार्ड या काही पहिल्या नेत्या नाहीत. गेल्या काही महिन्यांत ट्रम्प प्रशासनातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत किंवा त्यांना पदावरून हटवले गेले आहे:
लोरी चावेझ-डेरेमर: एप्रिल महिन्यात कामगार मंत्री लोरी चावेझ-डेरेमर यांनी देखील त्यांच्यावर सुरू असलेल्या गैरवर्तनाच्या चौकशीमुळे राजीनामा दिला था.
क्रिस्टी नोएम: मार्च अखेरीस अंतर्गत सुरक्षा मंत्री क्रिस्टी नोएम यांना ट्रम्प यांनी पदावरून हटवले होते. स्थलांतरित नागरिकांवरील कारवाई आणि आपत्ती व्यवस्थापनातील अपयशामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
पॅम बोंडी: जेफ्री एप्स्टाईन प्रकरणाशी संबंधित फाईल्स योग्यरित्या न हाताळल्यामुळे न्यायदलातील अंतर्गत नाराजीनंतर अॅटर्नी जनरल पॅम बोंडी यांना पद सोडावे लागले होते.
हे देखील वाचा – Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ! गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा झटका










