Home / देश-विदेश / Dhruv Rathee : पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उतरलेली ‘अनुपमा’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!ध्रुव राठीला उत्तर देणं रुपाली गांगुलीला पडलं महागात; पाहा काय घडलं!

Dhruv Rathee : पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ उतरलेली ‘अनुपमा’ नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!ध्रुव राठीला उत्तर देणं रुपाली गांगुलीला पडलं महागात; पाहा काय घडलं!

Dhruv Rathee : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली हिने प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याच्या एका वादग्रस्त विधानावर...

By: Team Navakal
Dhruv Rathee
Social + WhatsApp CTA

Dhruv Rathee : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली हिने प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठी याच्या एका वादग्रस्त विधानावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात ध्रुव राठीने केलेल्या विधानाचा रुपाली गांगुलीने कठोर शब्दांत समाचार घेतला असून, परदेशात बसून भारताची प्रतिमा मलीन करणाऱ्यांना भारतीयांच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे तिने ठणकावून सांगितले आहे.

वादाची ठिणगी: ध्रुव राठीचे ‘ते’ वादग्रस्त ट्वीट
ध्रुव राठीने १९ मे रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट केली होती. नॉर्वेजियन पत्रकार हेले गॅनेस्टॅड यांच्याशी संबंधित एका घटनेचा संदर्भ देत ध्रुवने लिहिले होते की, “पंतप्रधान मोदी जिथे कुठे जातील, तिथे सर्वत्र त्यांचा अपमानच झाला पाहिजे. पंतप्रधान झाल्यापासून गेल्या १२ वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्यात ते अपयशी ठरले आहेत.” इतकेच नव्हे तर, त्याने युरोपीय पत्रकारांना आवाहन केले होते की, त्यांनी मोदींना कठीण प्रश्न विचारून त्यांना उत्तरे देण्यास भाग पाडावे. या विधानानंतर अभिनेत्री गुल पनाग हिनेही ध्रुववर टीका केली होती.

रुपाली गांगुलीचे चोख प्रत्युत्तर
ध्रुव राठीची ही पोस्ट पाहून रुपाली गांगुली प्रचंड संतापली. तिने या पोस्टला ‘कोट’ करत एक सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. रुपालीने म्हटले की, “ज्यांना जगभरातील विविध देश आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करत आहेत, अशा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित नेत्यासाठी ‘अपमान’ हा शब्द वापरणे अत्यंत क्लेशदायक आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान आहेत.”

पुढील टीकेत तिने ध्रुव राठीच्या पार्श्वभूमीवर निशाणा साधला. रुपालीने लिहिले, “भारताच्या प्रगतीची काळजी घेण्यासाठी १४० कोटी भारतीय सक्षम आहेत. परदेशात वास्तव्य करणाऱ्या, भारतीय जमिनी वास्तवाशी कोणताही संबंध नसलेल्या आणि केवळ भारतद्वेष पसरवून आपली ऑनलाईन कारकीर्द घडवणाऱ्या कोणत्याही युट्यूबरची आम्हाला ‘प्रवक्ता’ म्हणून गरज नाही.”

सोशल मीडियावर मतमतांतरे आणि रुपाली गांगुली ‘ट्रोल’
रुपाली गांगुलीने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे काहींनी समर्थन केले असले, तरी सोशल मीडियावरील एका मोठ्या वर्गाने तिच्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ध्रुव राठीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समर्थन करत नेटकऱ्यांनी रुपालीला विचारले की, “पंतप्रधानांनी गेल्या १२ वर्षांत पत्रकार परिषद का घेतली नाही, याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का?”

काही युजर्सनी आर्थिक वास्तवाकडे लक्ष वेधत रुपालीवर टीका केली. एका युजरने म्हटले की, “रुपाली गांगुलीकडे अमाप संपत्ती असल्याने तिला महागाईची झळ सोसावी लागत नाही. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे वाढलेले दर तिला परवडणारे असल्याने तिला सामान्य नागरिकांच्या समस्यांचे भान नाही.” या वादानंतर सोशल मीडियावर सध्या ‘प्रो-मोदी’ आणि ‘प्रो-राठी’ असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या