Samsung Galaxy F70e 5G Discount: जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून १०,००० ते १२,००० रुपयांच्या रेंजमध्ये एक चांगला आणि विश्वासार्ह ५जी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. सॅमसंग कंपनीचा बजेट फोन ‘Samsung Galaxy F70e 5G’ सध्या ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर मोठ्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध आहे.
या फोनवर ग्राहकांना ३४% पर्यंतचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा लाभ घेतल्यास या फोनची किंमत १०,००० रुपयांपेक्षाही कमी होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डील्स आणि त्याच्या भन्नाट फीचर्सबद्दल.
Samsung Galaxy F70e 5G Discount: फ्लिपकार्टवरील डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचे गणित
फ्लिपकार्टवर या सॅमसंग स्मार्टफोनची मूळ किंमत १८,९९९ रुपये सूचीबद्ध करण्यात आली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष सवलतीअंतर्गत कंपनी यावर थेट ३४% ची सूट देत आहे.
- फ्लॅट डिस्काउंट: थेट कपातीनंतर हा फोन केवळ १२,४९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा ऑफर फोनच्या ४GB रॅम आणि १२८GB अंतर्गत स्टोरेज असलेल्या मॉडेलवर दिली जात आहे.
- बँक डिस्काउंट: जर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक किंवा फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केले, तर तुम्हाला ६५० रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. यामुळे फोनची किंमत थेट ११,८७४ रुपयांवर येते.
- एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय: या फोनवर १०,३०० रुपये पर्यंतची एक्सचेंज व्हॅल्यू दिली जात आहे, जी तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. याशिवाय, ग्राहक अवघ्या ४४० रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर देखील हा फोन घरी आणू शकतात.
Samsung Galaxy F70e 5G Discount: फीचर्स
कमी किंमतीत ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सॅमसंगने या फोनमध्ये अनेक तगडे फीचर्स दिले आहेत. या फोनची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- बॅटरी बॅकअप: या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दिलेली ६०००mAh ची प्रचंड मोठी बॅटरी, जी एकदा चार्ज केल्यावर दीर्घकाळ टिकते.
- डिस्प्ले आणि स्क्रीन: फोनमध्ये ६.७ इंचाचा मोठा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०Hz च्या स्मूथ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसण्यासाठी यामध्ये ८०० निट्सची पीक ब्राइटनेस मिळते.
- प्रोसेसर आणि परफॉर्मन्स: वेगवान कामगिरीसाठी हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० या शक्तिशाली प्रोसेसरवर काम करतो.
- कॅमेरा सेटअप: फोटो आणि व्हिडिओसाठी फोनच्या मागील बाजूला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तसेच, सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा – GT Team Bus Fire: IPL फायनल संपल्यानंतर मोठा अनर्थ टळला! गुजरात टायटन्सच्या टीम बसला भीषण आग; खेळाडू थोडक्यात बचावले










