Jio Plan: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच एकापेक्षा एक भन्नाट प्लॅन्स सादर केले आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात आजच्या तरुणांमध्ये स्नॅपचॅट या अॅपची क्रेझ प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. ग्राहकांची हीच आवड लक्षात घेऊन जिओ आता भारत आणि शक्यतो जगातील पहिली अशी कंपनी बनली आहे, जी आपल्या रिचार्ज प्लॅनसोबत ‘स्नॅपचॅट प्लस’चे सबस्क्रिप्शन अगदी मोफत देत आहे.
जिओने खास तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून 459 रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे. या एकाच रिचार्जमध्ये अनेक महागडे आणि प्रीमियम फीचर्स मोफत दिले जात आहेत.
४५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे मुख्य फायदे
या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना नेहमीच्या कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त अनेक अतिरिक्त सोयी मिळतात:
- कॉलिंग आणि एसएमएस: कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद मोफत कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सोय.
- रोजचा डेटा: दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळेल. जर तुमचा रोजचा डेटा संपला, तर इंटरनेट पूर्णपणे बंद होणार नाही, तर 64 Kbps च्या गतीने सुरू राहील.
- ५GB बोनस डेटा: नेहमीच्या डेटा व्यतिरिक्त कंपनी 5GB अतिरिक्त बोनस डेटा देखील देत आहे, जो तुमचा रोजचा कोटा संपल्यानंतर आपोआप सक्रिय होईल.
- अनलिमिटेड ५G: या प्लॅनमध्ये पात्र ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त मर्यादा नसलेला मोफत अनलिमिटेड ५G डेटा वापरता येईल.
गुगल एआय प्रो आणि ३५,१०० रुपयांचे बंपर बेनेफिट्स
या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासोबत मिळणारे मोफत प्रीमियम सबस्क्रिप्शन्स आहेत, जे ग्राहकांचे हजारो रुपये वाचवतील:
१. Google AI Pro: या प्लॅनसोबत तब्बल 35,100 रुपये किमतीचे 18 महिन्यांचे गुगल एआय प्रो सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जात आहे. यामध्ये ग्राहकांना 5000GB क्लाउड स्टोरेज, नॅनो बनाना आणि इतर प्रगत एआय फीचर्स मिळतात. (लक्षात ठेवा की हा लाभ भविष्यात चालू ठेवण्यासाठी ग्राहकांना पुढे नेहमी 349 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज करावे लागेल.)
२. Snapchat+ सबस्क्रिप्शन: स्नॅपचॅट प्लससाठी भारतात सामान्यतः महिन्याला 49 रुपये किंवा वर्षाला 499 रुपये मोजावे लागतात. परंतु, जिओ युजर्सना हे मायजिओ अॅपद्वारे मोफत सक्रिय करता येईल. यामुळे तुमची स्टोरी कोणी पुन्हा पाहिली हे चेक करणे आणि कस्टम नोटिफिकेशन सेट करणे असे भन्नाट फीचर्स वापरता येतील.
३. JioAICloud स्टोरेज: फाईल्स आणि फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी 50GB चे क्लाउड स्टोरेज मोफत मिळेल.
४. मनोरंजन: ३ महिन्यांसाठी जिओहॉटस्टार मोबाईलचे अॅक्सेस, जिओटीव्हीच्या मदतीने फॅनकोडवरील क्रीडा सामने पाहण्याची सोय आणि जिओगेम्स मोबाईलचा सपोर्ट यामध्ये समाविष्ट आहे.










