Home / महाराष्ट्र / Sharad Pawar Party : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? चर्चेला उधाण

Sharad Pawar Party : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? चर्चेला उधाण

Sharad Pawar Party : काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेसमधून वेगळे झालेल्या सर्व घटक पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे आणि शरद...

By: Team Navakal
Sharad Pawar
Social + WhatsApp CTA

Sharad Pawar Party : काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेसमधून वेगळे झालेल्या सर्व घटक पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन व्हावे आणि शरद पवार यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे मत शिवसेना उबाठाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल व्यक्त केले होते. त्यानंतर आज लगेचच शरद पवारांचा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राऊतांच्या सूचनेचे स्वागत करत हा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी शरद पवार यांना आहे, असे सांगून या चर्चेत भर घातली.

तृणमूल काँग्रेसनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला काँग्रेसने आपल्या पक्षात विलीन करण्याची ऑफर दिल्याची चर्चा गेले दोन दिवस राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबतीत अधिकृरित्या दोन्ही पक्षातील कुणीच काही वक्तव्य केले नव्हते. काल संजय राऊत यांनी या विषयावर टिपण्णी केल्यानंतर आज काँग्रेसच्या राज्यातील काही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाष्य केले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रस्ताव 2024 सालीच दिला होता. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील विलीनीकरणाला अनुकूल भूमिका मांडली. ते म्हणाले की, विलीनीकरणाच्या प्रस्तावाबद्दल मला काही माहिती नाही. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा एकच आहे. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते.


राजस्थानमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राऊत यांच्या मताला पाठिंबा देत असे आवाहन केले की, काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सर्व घटक पक्षांनी पुन्हा काँग्रेसमध्ये सामील व्हावे आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारावे. संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. भाजपाकडून लोकशाही पायदळी तुडवली जात आहे. आपण सर्व लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. आता देशाला असा स्पष्ट संदेश देणे गरजेचे आहे की, आमच्याकडे असा नेता आहे ज्याला आम्ही सर्वांनी एकमताने स्वीकारले आहे. तेव्हाच जनता आपल्याला साथ देईल. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसर्‍या बाजूला राहुल गांधी असे चित्र उभे राहील तेव्हाच दोघांपैकी एकाला निवडण्याचा पर्याय जनतेपुढे असेल.


शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या विरोधी भूमिका मांडली. ते म्हणाले की, विलीनीकरणाच्या बातमीत कुठलेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विलीनीकरणासंदर्भातील कोणताही प्रस्ताव काँग्रेस पक्षाला देण्यात आलेला नाही. काँग्रेसकडूनदेखील तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांची आमच्यासोबत चर्चा केलेली नाही. नाना पटोले यांनी आधी आपल्या पक्षाचीं बांधावी. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या