Budget Electric Scooters: भारतीय ऑटो बाजारात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. रोजच्या प्रवासासाठी खिशाला परवडणारी आणि वजनाने हलकी गाडी शोधणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ग्राहकांची हीच गरज ओळखून आघाडीच्या कंपन्यांनी बजेट फ्रेंडली गाड्या बाजारात आणण्यावर भर दिला आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की चांगली रेंज आणि हाय-स्पीड मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात, तर तसे अजिबात नाही. ६० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स देणाऱ्या ५ लोकप्रिय गाड्यांची नवीन यादी आणि त्यांचा परफॉर्मन्स खालीलप्रमाणे आहे:
१. Bounce Infinity E1: मजबूत बांधणी आणि चांगला परफॉर्मन्स
टीव्हीएस आणि ओलाच्या गाड्यांना बाजारात टक्कर देणारा बाउन्स इन्फिनिटी हा एक उत्तम आणि खात्रीशीर पर्याय मानला जातो.
- किंमत: या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 55,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
- परफॉर्मन्स: या स्कूटरला एकदा फुल चार्ज केल्यावर तुम्हाला 70 किलोमीटरची रेंज मिळते आणि ही गाडी 65 किलोमीटर प्रति तास या टॉप स्पीडने चालवता येते.
२. Zelio Gracy I: सर्वसामान्यांच्या बजेटमधील गाडी
कमी बजेट असलेल्या भारतीय ग्राहकांसाठी हा एक अतिशय चांगला आणि परवडणारा पर्याय म्हणून समोर आला आहे.
- किंमत: या स्कूटरची भारतीय बाजारातील एक्स-शोरूम किंमत 54,000 रुपये आहे.
- परफॉर्मन्स: एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही स्कूटर 70 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. तर याचा टॉप स्पीड 65 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
३. Ola SX1: बजेटमध्ये तुफानी वेग
ओला इलेक्ट्रिक कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बजेट सेगमेंटमध्ये ही स्कूटर अतिशय लोकप्रिय ठरत आहे.
- किंमत: या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 49,999 रुपये आहे.
- परफॉर्मन्स: ओलाची ही स्कूटर एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल 108 किलोमीटर धावते. या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा वेग, ही स्कूटर 90 किलोमीटर प्रति तास या तुफानी वेगाने धावू शकते.
४. Vida VX2 GO: हिरोचा नवा आणि स्वस्त फॉर्म्युला
हिरो कंपनीच्या विडा ब्रँडच्या स्कूटर्सना ग्राहकांकडून सध्या मोठी पसंती मिळत आहे. बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनमुळे या गाड्यांच्या किमती खूपच कमी झाल्या आहेत.
- किंमत: विडाचे व्हीएक्स2 गो हे मॉडेल तुम्हाला केवळ 44,990 रुपये एक्स-शोरूम किमतीत मिळू शकते.
- परफॉर्मन्स: ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये तब्बल 92 किलोमीटरपर्यंतची रेंज देते आणि याचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे.
५. TVS Orbiter V1: विश्वासू ब्रँडची सर्वात स्वस्त स्कूटर
दु्याची वाहनांच्या दुनियेत विश्वासू असलेल्या टीव्हीएस कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ही गाडी बॅटरी सबस्क्रिप्शन प्लॅनसह बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- परफॉर्मन्स: एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 86 किलोमीटरपर्यंत धावते. तसेच याचा टॉप स्पीड 68 किलोमीटर प्रति तास इतका आहे.
- किंमत: या प्लॅनसह स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 49,999 रुपये आहे. यासाठी तुम्हाला दरमहा 862 रुपयांचे शुल्क द्यावे लागेल.










