Home / लेख / PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी संदर्भात मोठी अपडेट

PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार? शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी संदर्भात मोठी अपडेट

PM Kisan 23rd Installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये...

By: Team Navakal
PM Kisan 23rd Installment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार? शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी संदर्भात मोठी अपडेट
Social + WhatsApp CTA

PM Kisan 23rd Installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशातील अनेक भागांमध्ये भात लावणीच्या आणि इतर शेतीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या या कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची मोठी आवश्यकता असते. अशातच आता ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.

रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार पुढील महिन्याच्या म्हणजेच जुलै 2026 च्या मध्यात हा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करू शकते. मात्र, सरकारकडून अद्याप याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

योजनेची आतापर्यंतची स्थिती काय?

केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना वर्षाला आर्थिक बळ दिले जाते:

  • शेवटचा हप्ता कधी मिळाला?: यापूर्वी 13 मार्च 2026 रोजी योजनेचा 22 वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुवाहाटी येथून ही रक्कम जारी केली होती.
  • इतक्या शेतकऱ्यांना फायदा: मार्च महिन्यातील हप्त्यामध्ये 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 18,640 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते.
  • एकूण वाटप: या योजनेच्या सुरवातीपासून आतापर्यंत देशातील कोट्यवधी बळीराजाला एकूण 4.25 लाख कोटी रुपयांचे थेट वाटप करण्यात आले आहे.

या १ चुकीमुळे अडकू शकतात तुमचे पैसे; ‘ई-केवायसी’ अनिवार्य

जर तुम्हाला 23 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर बँक खात्याशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे कि, ज्या शेतकऱ्यांनी आपली ‘ई-केवायसी’ (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे, केवळ त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील. तसेच ज्यांच्या जमिनीची कागदपत्रे अद्ययावत (लँड रेकॉर्ड अपडेट) नाहीत, त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

शेतकरी तीन सोप्या पद्धतींनी आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. यामध्ये ओटीपी (OTP), बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशन या पर्यायांचा समावेश आहे. जर तुम्ही ओटीपी पर्याय निवडणार असाल तर तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे. नागरिक आपल्या जवळच्या जनसुविधा केंद्रावर जाऊनही ही प्रक्रिया करून घेऊ शकतात.

लाभार्थी यादीत तुमचे नाव कसे तपासावे?

तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (pmkisan.gov.in) भेट द्या.
  2. तिथे होमपेजवर असलेल्या “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा.
  3. तुमचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन नंबर) आणि दिलेला कॅप्चा कोड अचूक भरा.
  4. शेवटी “Get Data” या बटनावर क्लिक करताच तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल.

कोणत्याही अडचणीच्या वेळी किंवा चौकशीसाठी शेतकरी 155261 किंवा 011-24300606 या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर कॉल करून थेट माहिती मिळवू शकतात.

नवीन शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत

नवीन नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन “New Farmer Registration” हा पर्याय निवडावा. तिथे विचारलेली सर्व माहिती, ओळखपत्राचा तपशील आणि शेतीची कागदपत्रे अचूक भरून फॉर्म सबमिट करावा. भविष्यातील वापरासाठी या फॉर्मची एक प्रिंट आऊट काढून स्वतःजवळ ठेवावी. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपये दिले जातात. प्रत्येकी 2,000 रुपयांचे 3 हप्ते थेट बँक खात्यात जमा केले जातात.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : तूर्तास पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेचा कडाका कायम राहणार; पण लवकरच महाराष्ट्रात मान्सूनची प्रतीक्षा संपणार-हवामान विभागाने सांगितलेल्या ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पावसाची शक्यता..