Korean Skincare Secrets: आजकाल जगभरात कोरियन वेब सीरिज आणि गाण्यांसोबतच कोरियन स्किनकेअरचा ट्रेंडही वेगाने पसरत आहे. वय वाढलेले असतानाही तिथल्या महिला आणि पुरुषांची त्वचा अगदी 25 ते 30 वर्षांच्या तरुणांसारखी तुकतुकीत आणि घट्ट दिसते. त्यांच्या चेहऱ्यावर ना सुरकुत्या दिसतात, ना त्वचा सैल पडते. या काचेसारख्या चमकदार त्वचेचे खरे रहस्य त्यांच्या रोजच्या सवयींमध्ये दडलेले आहे.
कोरियन लोक त्यांच्या त्वचेची काळजी घेताना ‘कोलेजन’ वाढवण्याला सर्वाधिक महत्त्व देतात. कोलेजन हे त्वचेला घट्ट, मऊ आणि तरुण ठेवण्याचे काम करते. वाढत्या वयानुसार शरीरातील याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा आणि सुरकुत्या येतात. हा त्रास दूर करण्यासाठी आणि वाढत्या वयातही चेहऱ्याचा ग्लो टिकवण्यासाठी बाजारातील महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घेऊन तुम्ही हा ग्लो मिळवू शकता.
१. राइस वॉटर टोनर: कोरियन महिलांचा सर्वात आवडता उपाय
तांदळाचे पाणी हा कोरियन सौंदर्य शास्त्राचा सर्वात मुख्य पाया मानला जातो. यामध्ये असलेले अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला कमालीची फ्रेशनेस देतात.
- कसे तयार करावे?: 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते 2 कप पाण्यात 30 मिनिटांसाठी भिजत ठेवा.
- वापर कसा करावा?: हे पाणी गाळून एका बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. चेहरा स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पाणी टोनरसारखे चेहऱ्यावर लावा. हे पाणी तुम्ही 3 ते 4 दिवसांपर्यंत वापरू शकता.
२. सीवीड आणि अॅलोवेरा जेल मास्क
समुद्री शेवाळ म्हणजेच सीवीडमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेचे आरोग्य सुधारतात.
- कसे तयार करावे?: वाळलेले सीवीड कोमट पाण्यात 10 मिनिटे भिजवून त्याची बारीक पेस्ट तयार करा. यामध्ये 2 चमचे ताजे अॅलोवेरा जेल आणि इच्छेनुसार 3 ते 4 थेंब रोझहिप ऑईल मिक्स करा.
- वापर कसा करावा?: हा मास्क चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून घ्या. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2 वेळा याचा वापर करा.
३. रात्रीसाठी खास कोलेजन पॅक
रात्रीच्या वेळी आपली त्वचा स्वतःची दुरुस्ती म्हणजेच रिपेअरिंगचे काम करत असते, त्यामुळे कोरियन पद्धतीमध्ये नाईट पॅकला विशेष महत्त्व आहे.
- कसे तयार करावे?: 1 अंड्याचा पांढरा भाग घ्या. त्यात अर्धा चमचा स्नेल म्युकसिन (उपलब्ध असल्यास) आणि 1 चमचा मध नीट मिक्स करा.
- वापर कसा करावा?: हे मिश्रण चेहऱ्यावर लावून रात्रभर तसेच ठेवा आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते.
४. बोन ब्रॉथ: आतून पोषण देणारे जुने रहस्य
कोरियामध्ये केवळ वरून गोष्टी लावण्यापेक्षा शरीराला आतून पोषण देण्यावर भर दिला जातो. बोन ब्रॉथ हा कोलेजनचा खूप मोठा स्रोत मानला जातो.
- कसे तयार करावे?: चिकनची हाडे एका मोठ्या भांड्यात पाण्यासोबत ठेवा. त्यात 2 मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, आले, लसूण आणि कांदा घाला. हे मिश्रण मंद आचेवर काही तास चांगले उकळू द्या.
- वापर कसा करावा?: हे सूप गाळून रोज 1 कप पिण्याने त्वचेमधील ओलावा टिकून राहतो आणि लवचिकता वाढते.
५. कोलेजन स्मूदी: त्वचेला मिळेल नैसर्गिक चमक
आहाराचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो, म्हणूनच कोरियन लोक त्यांच्या आहारात खास स्मूदीचा समावेश करतात.
- वापर कसा करावा?: हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून याचे सेवन करा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
- कसे तयार करावे?: 1 कप डाळिंबाचा रस, अर्धे अॅव्होकॅडो, 1 मोठा चमचा अळशी किंवा चिया सीड्स आणि थोडी ब्लुबेरी घ्या. चवीसाठी यामध्ये थोडे मध घाला.










