Bajaj Pulsar 220F : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या बजाज पल्सरने पुन्हा एकदा नवा धमाका केला आहे. बजाज ऑटोने आपली सर्वात लोकप्रिय आणि क्लासिक बाईक Bajaj Pulsar 220F नवीन आधुनिक फीचर्ससह अपडेट करून बाजारात आणली आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेल्या या बाईकची क्रेझ आजही कायम आहे.
ग्राहकांची हीच अफाट दीवानगी पाहून कंपनीने या बाईकच्या मूळ डिझाईनमध्ये कोणताही मोठा बदल न करता वेळोवेळी छोटे अपडेट्स दिले आहेत. आता कंपनीने या बाईकमध्ये थेट सर्वात मोठा बदल करत नवीन कडक लाईटिंग सेटअप दिला आहे, ज्यामुळे बाईकचा लुक आणखीनच डॅशिंग दिसतो आहे.
Bajaj Pulsar 220F : किंमत किती वाढली? पाहा नवीन एक्स-शोरूम प्राईस
नवीन फीचर्सच्या समावेशामुळे या बाईकच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे:
- नवीन किंमत: फुल एलईडी हेडलाईटसह येणाऱ्या या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.36 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
- ८ हजारांनी महाग: डिसेंबर 2025 मध्ये लाँच झालेल्या आधीच्या मॉडेलची किंमत 1.28 लाख रुपये होती. नव्या अपडेटेड फीचर्समुळे ही बाईक आता 8 हजार रुपयांनी महाग झाली आहे.
Bajaj Pulsar 220F : काय बदलले आणि कोणते फीचर्स आहेत नवीन?
या वेळच्या अपडेटमध्ये कंपनीने प्रामुख्याने बाईकच्या लाईटिंग सिस्टमवर काम केले आहे:
- फुल एलईडी हेडलाईट: बाईकमध्ये आता संपूर्ण एलईडी हेडलाईट सेटअप देण्यात आला आहे, जो ऑटो-ऑन फीचरसह येतो.
- सिंगल प्रोजेक्टर सेटअप: पूर्वी या बाईकमध्ये लो आणि हाय बीमसाठी दोन वेगवेगळ्या व्हर्टिकल लाईट्स असायच्या. आता या दोन्ही लाईट्स एकाच प्रोजेक्टरमध्ये एकत्र करण्यात आल्या आहेत.
- आयब्रो स्टाईल डीआरएल्स: बाईकच्या फ्रंटला आयब्रो म्हणजेच भुवयांच्या आकाराचे आकर्षक डीआरएल्स देण्यात आले आहेत. तसेच एलईडी इंडिकेटर्स आधीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.
Bajaj Pulsar 220F : इंजिन आणि जुना कडक लुक तसाच कायम
लाईटिंग आणि किंमत वगळता कंपनीने या बाईकच्या इंजिन आणि मूळ रचनेत कोणताही बदल केलेला नाही. यात तोच जुना आणि विश्वासू 220 सीसीचा सिंगल सिलेंडर इंजिन मिळतो, जो 20.4 पीएसची पॉवर आणि 18.55 एनएमचा टॉर्क जनरेट करतो. यासोबतच 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकमध्ये 15 लीटरची मोठी इंधन टाकी असून तिचे एकूण वजन 160 किलोग्रॅम आहे. क्लिप-ऑन हँडलबार आणि स्पोर्टी सायलेन्सर यांसारखे जुने क्लासिक डिझाईन एलिमेंट्स यात पाहायला मिळतात.
हे देखील वाचा – Operation Tiger Update: 6 बंडखोर खासदारांना ‘वाय प्लस’ सुरक्षा; संजय राऊतांच्या ‘ऑपरेशन तुडवा’च्या इशाऱ्यानंतर गृहमंत्रालयाचा अॅक्शन प्लॅन











