Home / महाराष्ट्र / Rajabhau Waje : ६ खासदार कोटींच्या ऑफरवर विकले गेले?, पण नाशिकच्या लेकाने स्वाभिमान विकला नाही; १०० कोटी नाकारणाऱ्या राजाभाऊ वाजेंना वडिलांनी प्रेमाने जवळ घेतल..

Rajabhau Waje : ६ खासदार कोटींच्या ऑफरवर विकले गेले?, पण नाशिकच्या लेकाने स्वाभिमान विकला नाही; १०० कोटी नाकारणाऱ्या राजाभाऊ वाजेंना वडिलांनी प्रेमाने जवळ घेतल..

Rajabhau Waje : दिल्लीतील नाट्यमय घडामोडी आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे...

By: Team Navakal
Rajabhau Waje
Social + WhatsApp CTA

Rajabhau Waje : दिल्लीतील नाट्यमय घडामोडी आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे पहिल्यांदाच आपल्या गृहजिल्ह्यात दाखल झाले. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटले असताना, १०० कोटी रुपयांच्या विकासनिधीची भव्य ऑफर आणि विविध प्रलोभने धुडकावून राजाभाऊ वाजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या पार्श्वभूमीवर, नाशिकरोड रेल्वे स्थानकावर हजारो शिवसैनिकांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि प्रचंड घोषणाबाजीत त्यांचे जंगी व ऐतिहासिक स्वागत केले. मात्र, या जंगी स्वागतानंतर जेव्हा राजाभाऊ आपल्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा तिथे राजकारणाच्या पलीकडील एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावूक क्षण पाहायला मिळाला.

रेल्वे स्थानकावरील कार्यकर्त्यांचा उत्साह अनुभवून खासदार राजाभाऊ वाजे थेट आपल्या निवासस्थानी पोहोचले. घराचा उंबरठा ओलांडताच त्यांनी आपले वडील प्रकाश वाजे यांच्या चरणांवर डोके ठेवून आशीर्वाद घेतले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर, वडिलांनी अत्यंत अभिमानाने आपल्या निष्ठावंत पुत्राच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि त्यांना मायेने जवळ घेतले. पित्याने पाठीवर मारलेली ती शाबासकीची थाप आणि दिलेली निष्ठेची पावती पाहून राजाभाऊंना आपल्या भावना अनावर झाल्या. वडिलांच्या कुशीत विसावताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या वाजे पित्या-पुत्राच्या अत्यंत भावूक भेटीचा आणि कौटुंबिक संस्कारांची साक्ष देणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित (व्हायरल) होत असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात राजाभाऊ वाजे यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी सत्ताधारी शिंदे गटाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जाहीर आरोप केला होता की, बंडखोरांमध्ये सामील होण्यासाठी प्रत्येक खासदाराला १५ कोटी रुपयांचे आगाऊ ‘टोकन’ आणि मतदारसंघासाठी १०० कोटी रुपयांच्या विकासकामांची आमिषे दाखवली जात होती. याच मोहिमेचा भाग म्हणून १४ एप्रिल रोजी शिंदे गटाच्या दोन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी राजाभाऊंच्या सिन्नर येथील निवासस्थानी धाव घेतली होती. त्यांनी राजाभाऊंचे वडील प्रकाश वाजे यांची तब्बल दोन ते अडीच तास मनधरणी करून त्यांना राजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाजे कुटुंबाने या कोट्यवधींच्या ऑफर्सना आणि सत्तेच्या अमिशांना स्पष्टपणे नाकारून, बाळासाहेबांच्या विचारांशी आणि उद्धव ठाकरेशी प्रतारणा करणार नाही, असा ठाम बाणा दाखवला. यापूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेतही, राऊत जेव्हा पक्षावरील संकट आणि राजाभाऊंच्या निष्ठेचा गौरव करत होते, तेव्हा पक्षाच्या परिस्थितीमुळे राजाभाऊंना कॅमेऱ्यासमोरच अश्रू अनावर झाले होते.

नाशिकमध्ये पाऊल ठेवताच पत्रकारांशी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपली भूमिका अत्यंत संयत आणि ठामपणे मांडली. ते म्हणाले, “ज्या विचारधारेवर आणि मतदारांच्या विश्वासावर मी निवडून आलो आहे, त्या विचारधारेशी प्रामाणिक राहणे हे माझे कर्तव्यच होते. आज कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत ही मी घेतलेला निर्णय योग्य असल्याचा पुरावा आहे. मला कोणत्याही ऑफरची गरज नव्हती, कारण मतदारांचे आणि पक्षप्रमुखांचे जे प्रेम मला मिळत आहे, ते माझ्यासाठी कोणत्याही वैभवापेक्षा मोठे आहे. मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असून, या कठीण परिस्थितीतून शिवसेना निश्चितपणे पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल. आज नाशिककरांनी केलेले हे स्वागत म्हणजे माझा दुसरा विजयच आहे. मात्र, एकेकाळी एकसंध असलेल्या शिवसेनेचे आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापनदिन साजरे होत आहेत, याचे एक जुना शिवसैनिक म्हणून मनाला नक्कीच दुःख आहे. मी शिवसेना एक असताना आमदार म्हणून काम केले आहे आणि आज दोन पक्ष झाले असताना खासदार आहे; परंतु माझी निष्ठा आजही तसूभरही ढळलेली नाही.” त्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ठाकरेशी प्रामाणिक राहणाऱ्या कार्यकर्त्यांना एक नवे बळ मिळाले आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या