Home / महाराष्ट्र / Amit Shah : अंबाबाईच्या दारात ‘व्हीआयपी’ राजा अन् सामान्य रंक? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी अंबाबाईचे दर्शन साडेचार तास बंद..

Amit Shah : अंबाबाईच्या दारात ‘व्हीआयपी’ राजा अन् सामान्य रंक? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यासाठी अंबाबाईचे दर्शन साडेचार तास बंद..

Amit Shah : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्री आपल्या पत्नी सोनम शाह यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीहून कोल्हापूर...

By: Team Navakal
Amit Shah
Social + WhatsApp CTA

Amit Shah : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्री आपल्या पत्नी सोनम शाह यांच्यासह विशेष विमानाने दिल्लीहून कोल्हापूर विमानतळावर दाखल होत आहेत. त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज रात्री साधारण नऊ ते दहाच्या सुमारास त्यांचे आगमन होणार असून, विमानतळावरून ते थेट शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. शनिवार, दिनांक २० जून रोजी त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये विविध राजकीय आणि शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाने करणार आहेत.

शनिवारी सकाळी ठीक नऊ वाजता अमित शाह हे अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचणार आहेत. मात्र, त्यांच्या या व्हीआयपी (VIP) दौऱ्याच्या सुरक्षिततेचे कारण पुढे करत मंदिर प्रशासनाने शनिवारी सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या साडेचार तासांच्या कालावधीत सर्वसामान्य भाविकांसाठी देवीचे दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे दुरून आलेल्या आणि तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या सामान्य भक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. अमित शाह यांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे तब्बल चार तास बंद ठेवण्यात आल्यामुळे कोल्हापूरकरांसह राज्यभरातील भाविकांमधून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.

या सर्व घडामोडींनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने देशातील व्हीआयपी संस्कृती (VIP Culture) संपुष्टात आणण्याच्या गोष्टी करतात, मग त्यांच्याच मंत्रिमंडळातील गृहमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला येत असताना सामान्य जनतेला चार तास देवीच्या दर्शनापासून का वंचित ठेवले जात आहे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह अंबाबाई मंदिर संवर्धन व विकासकामांचा आढावा घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. यावर आक्षेप घेत, “हा विकासकामांचा आढावा रात्रीच्या वेळी किंवा गर्दी नसतानाही घेता आला असता, जेणेकरून लाखो भाविकांचे हाल झाले नसते,” असे सूर सोशल मीडियावर उमटत आहेत.

अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याची प्रशासकीय जय्यत तयारी; अंबाबाई मंदिर विकासकामांचा शुभारंभ आणि इचलकरंजीत नामकरण सोहळा; सुरक्षेसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
शनिवार, दिनांक २० जून रोजी सकाळी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाने त्यांच्या मुख्य कार्यक्रमांची सुरुवात होईल. या दौऱ्यादरम्यान अंबाबाई मंदिर संवर्धन आणि विकास आराखड्यांतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘प्रदक्षिणा मार्ग’ तसेच ‘राम मंदिर जतन व संवर्धन’ या ऐतिहासिक कामांचा रीतसर प्रारंभ अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री मंदिरात उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा यंत्रणा कमालीची सतर्क झाली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत मंदिर देवस्थान समिती आणि पोलीस प्रशासनाने शनिवारी सकाळी आठ ते दुपारी साडेबारा या साडेचार तासांच्या कालावधीत सर्वसामान्य भाविकांसाठी देवीचे दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे मंदिर परिसर आणि संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वच्छतेची मोहीम वेगाने राबवली जात आहे. सध्या मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या विविध विकासकामांचे सर्व बांधकाम साहित्य तातडीने तेथून हलवण्यात आले आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून परिसरातील तात्पुरते मंडप, फेरीवाले आणि फूल विक्रेत्यांचे स्टॉल प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या मंदिर परिसरातील सर्व व्यावसायिक दुकाने शनिवारच्या सत्रात पूर्णपणे बंद ठेवण्याच्या कडक सूचना पोलीस प्रशासनाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिल्या आहेत.

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व वरिष्ठ शासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या