Home / arthmitra / RBI Action on Banks: RBI चा देशातील 3 बँकांना मोठा दणका! नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठोकला लाखोंचा दंड; महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा समावेश

RBI Action on Banks: RBI चा देशातील 3 बँकांना मोठा दणका! नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठोकला लाखोंचा दंड; महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा समावेश

RBI Action on Co-operative Banks: देशातील सर्व सरकारी, खासगी आणि सहकारी बँकांसह फायनान्स कंपन्यांच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)...

By: Team Navakal
RBI Action on Banks: RBI चा देशातील 3 बँकांना मोठा दणका! नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठोकला लाखोंचा दंड; महाराष्ट्रातील 'या' बँकेचा समावेश
Social + WhatsApp CTA

RBI Action on Co-operative Banks: देशातील सर्व सरकारी, खासगी आणि सहकारी बँकांसह फायनान्स कंपन्यांच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) बारीक लक्ष ठेवून असते. बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचे आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या वित्तीय संस्थांवर कडक कारवाई केली जाते. याच अंतर्गत आरबीआयने 25 जून रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करत देशातील 3 सहकारी बँकांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.

या कारवाईच्या कचाट्यात महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील सहकारी बँका सापडल्या आहेत. बँकांनी ग्राहकांच्या खात्यांशी संबंधित महत्त्वाची माहिती अपडेट न करणे आणि कर्जाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला 1 लाखाचा दंड; पाहा नक्की काय चुकले?

आरबीआयने जारी केलेल्या आदेशानुसार कारवाई झालेल्या बँकांची नावे आणि त्यांच्यावरील दंडाची रक्कम खालीलप्रमाणे आहे:

  • द मॉडर्न को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (चाळीसगाव, महाराष्ट्र): आरबीआयने 23 जून रोजी काढलेल्या आदेशानुसार या बँकेला 1 लाख रुपयांचा दंड केला आहे. या बँकेने एका वैयक्तिक कर्जदाराला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज मंजूर केले होते. याशिवाय, ग्राहकांचे केवायसी रेकॉर्ड्स ‘सेंट्रल केवायसी रेकॉर्ड्स रजिस्ट्री’ (CKYCR) मध्ये अपलोड करण्यात बँक अपयशी ठरली होती.
  • द नबपल्ली को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (पश्चिम बंगाल): या बँकेला सर्वाधिक म्हणजेच 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आरबीआयने 22 जून रोजी हा आदेश जारी केला. या बँकेने देखील ग्राहकांच्या केवायसीची महत्त्वाची कागदपत्रे वेळेत सीकेवायसीआर पोर्टलवर अपलोड केली नव्हती.
  • द ललगुडी को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (तामिळनाडू): आरबीआयने या बँकेवर 1 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. बँकेने आपल्या सभासदांना शेअर कॅपिटलचे पैसे परत करताना आणि नवीन कर्ज मंजूर करताना शेअर लिंकिंगच्या आवश्यक अटींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे तपासात समोर आले होते.

ग्राहकांच्या पैशांवर आणि खात्यांवर काय होणार परिणाम?

आरबीआयने स्पष्ट केले आहे की, ही कारवाई केवळ बँकांनी अंतर्गत नियमांचे आणि वैधानिक तरतुदींचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे. याचा या बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या सामान्य ग्राहकांच्या खात्यांवर किंवा त्यांच्या व्यवहारांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असून बँकांचे दैनंदिन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या