Home / लेख / WhatsApp Username Feature: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल! आता नंबर न देताही करता येणार चॅटिंग; ‘हे’ खास फीचर लाँच

WhatsApp Username Feature: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल! आता नंबर न देताही करता येणार चॅटिंग; ‘हे’ खास फीचर लाँच

WhatsApp Username Feature: आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत कोणाशीही संवाद सुरू करायचा असल्यास स्वतःचा मोबाईल नंबर शेअर...

By: Team Navakal
WhatsApp Username Feature: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मोठा बदल! आता नंबर न देताही करता येणार चॅटिंग; 'हे' खास फीचर लाँच
Social + WhatsApp CTA

WhatsApp Username Feature: आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत कोणाशीही संवाद सुरू करायचा असल्यास स्वतःचा मोबाईल नंबर शेअर करणे बंधनकारक होते. अनोळखी व्यक्ती, नवीन व्यावसायिक संपर्क किंवा ग्रुपमधील लोकांशी बोलताना यामुळे वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असे.

मात्र, आता हा नियम कायमचा बदलणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी युझर्सच्या गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणारे ‘युझरनेम’ फीचर अधिकृतपणे लाँच केले आहे.

या नवीन सुविधेमुळे आता युझर्स मोबाईल नंबरऐवजी एका युनिक युझरनेमचा वापर करून एकमेकांशी जोडले जाऊ शकतील. कंपनीने 29 जूनपासून जागतिक स्तरावर युझरनेम रिझर्व्हेशन प्रक्रिया सुरू केली आहे. युझरनेम फीचर पूर्णपणे सर्वांसाठी उपलब्ध होण्यापूर्वी ग्राहकांना त्यांचे आवडते नाव बुक करण्याची संधी दिली जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी काय म्हणाले?

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून याविषयीची माहिती दिली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल शाह यांनी स्वतःचे युझरनेम आधीच बुक केले असून त्यांनी युझर्सला आवाहन करताना लिहिले, “वेळेला खूप महत्त्व आहे. हे फीचर जगासमोर येण्यापूर्वीच मी व्हॉट्सअ‍ॅपवर माझे युझरनेम सुरक्षित केले आहे. आता तुमची वेळ आहे, तुमचे आवडते नाव दुसऱ्या कोणी घेण्यापूर्वीच ते रिझर्व्ह करा.”

मोबाईल नंबरऐवजी युझरनेमची गरज का भासली?

कंपनीने स्पष्ट केले आहे की, हे फिचर केवळ सुरक्षेच्या कारणास्तव आणले गेले आहे. अनेकदा खालील परिस्थितींमध्ये लोकांना नंबर शेअर करायचा नसतो:

  • अनोळखी लोकांशी संपर्क: बिझनेस इव्हेंट्स, नवीन वर्गमित्र, शेजारी किंवा मुलांच्या शाळेच्या ग्रुपमधील लोकांशी संवाद साधताना नंबर देणे असुरक्षित वाटू शकते.
  • सोशल मीडियासारखे सर्च पर्याय नाही: हे इन्स्टाग्राम किंवा एक्ससारखे सोशल मीडिया हँडल नसेल. व्हॉट्सअ‍ॅपवर कोणताही पब्लिक डिरेक्टरी (सर्वसामान्यांसाठी शोध यादी) नसेल, जिथे लोक नावाने कोणाचाही प्रोफाइल शोधू शकतील. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुमचे अचूक युझरनेम माहीत नसेल, तोपर्यंत ती तुम्हाला मेसेज करू शकणार नाही.

सुरक्षेचा आणखी एक कडक स्तर: ‘युझरनेम की’

व्हॉट्सअ‍ॅपने सुरक्षेसाठी यामध्ये अजून एक ऐच्छिक पर्याय दिला आहे, ज्याला ‘युझरनेम की’ म्हटले जाईल.

  • या अंतर्गत युझर्स एक अतिरिक्त पासवर्ड किंवा की तयार करू शकतात.
  • पहिल्यांदा युझरनेमद्वारे मेसेज करणाऱ्या व्यक्तीला हा कोड टाकावा लागेल, तरच तिचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचेल.
  • ही की युझर्स कधीही बदलू शकतात, ज्यामुळे अनोळखी मेसेजवर पूर्ण नियंत्रण राहील.

तुमचे व्हॉट्सअ‍ॅप युझरनेम कसे रिझर्व्ह करावे?

तुमच्या आवडीचे युझरनेम बुक करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:

  1. सर्वात आधी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोअरवरून अपडेट करा.
  2. व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून ‘सेटिंग्ज’ (Settings) मध्ये जा.
  3. तिथे ‘अकाऊंट’ (Account) या पर्यायावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला ‘युझरनेम’ (Username) हा नवीन पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  5. उपलब्ध असलेले तुमचे आवडते नाव टाईप करून कन्फर्म करा.

नियम आणि अटी: हे युझरनेम कमाल 35 अक्षरांचे असू शकते. व्यावसायिक अकाऊंट्स आणि सेलिब्रिटींच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तींची नावे कंपनी आधीच राखून ठेवणार आहे. हे फीचर सुरू झाले तरी जुन्या चॅट्स आणि सेव्ह असलेल्या नंबरवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि ब्लॉक करण्याचे नियम पूर्वीसारखेच राहतील. येत्या काही महिन्यांत हे फीचर टप्प्याटप्प्याने सर्व देशांतील युझर्सच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा – Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 30 जूनची डेडलाईन हुकली; आता ‘या’ तारखेपर्यंत होणार कर्जमाफी

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या
Who is Sachin Ahir

Who is Sachin Ahir : डॉन अरुण गवळींचा भाचा, पवारांचे खंदे शिलेदार – ज्यांनी वरळीत स्वतःची ताकद पणाला लावून आदित्य ठाकरेंना जिंकवलं, त्यांनीच दिला ठाकरेंना महाझटका; कोण आहेत पडद्यामागचे किंगमेकर सचिन अहिर?