Home / लेख / धासू फीचर्ससह ‘Yamaha Aerox-E’ इलेक्ट्रिक मॅक्सी स्कूटर लाँच; किंमत तब्बल…

धासू फीचर्ससह ‘Yamaha Aerox-E’ इलेक्ट्रिक मॅक्सी स्कूटर लाँच; किंमत तब्बल…

Yamaha Aerox E Launch: भारतातील दुचाकी शौकीनांमध्ये लोकप्रिय असलेल्या यामाहा मोटर इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात एक मोठा पाऊल टाकले आहे....

By: Team Navakal
धासू फीचर्ससह 'Yamaha Aerox-E' इलेक्ट्रिक मॅक्सी स्कूटर लाँच; किंमत तब्बल...
Social + WhatsApp CTA

Yamaha Aerox E Launch: भारतातील दुचाकी शौकीनांमध्ये लोकप्रिय असलेल्या यामाहा मोटर इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात एक मोठा पाऊल टाकले आहे. कंपनीने आपली बहुप्रतीक्षित आणि अत्यंत प्रीमियम Aerox-E ही इलेक्ट्रिक मॅक्सी स्कूटर भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केली आहे. ज्या ग्राहकांना बाजारातील नेहमीच्या साध्या स्कूटरऐवजी स्पोर्टी परफॉर्मन्स, प्रगत तंत्रज्ञान आणि एक वेगळी स्टाईल हवी आहे, त्यांना डोळ्यांसमोर ठेवून या स्कूटरची निर्मिती करण्यात आली आहे.

या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 2.81 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही नवीन स्कूटर बाजारातील इतर प्रॅक्टिकल मॉडेलपेक्षा वरच्या श्रेणीतील असून, हिने पेट्रोलवर चालणाऱ्या लोकप्रिय Aerox 155 चा आक्रमक लूक आणि डिझाईन पूर्णपणे आत्मसात केले आहे.

सिंगल चार्जमध्ये ११७ किलोमीटरची धासू रेंज

यामाहाने या स्कूटरच्या पॉवर आणि बॅटरी चार्जिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या सोयीचा विचार केला आहे:

  • पॉवरफुल मोटर आणि स्पीड: स्कूटरमध्ये 9.4 kW ची पीक इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 48 Nm चा टॉर्क निर्माण करते. यामुळे स्कूटरचा टॉप स्पीड साधारण 95.5 किलोमीटर प्रतितासपर्यंत पोहोचतो.
  • रिमूवेबल बॅटरी सिस्टीम: या स्कूटरमध्ये 1.5 kWh क्षमतेचे दोन लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतात. या रिमूवेबल म्हणजेच सहज बाहेर काढता येणाऱ्या बॅटऱ्या आहेत. यामुळे मोठ्या इमारतींमध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना बॅटरी घरात नेऊन चार्ज करणे अत्यंत सोपे होणार आहे.
  • सर्टिफाइड रेंज आणि चार्जिंग वेळ: या दोन्ही बॅटऱ्यांच्या जोरावर ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 117 किलोमीटरची प्रमाणित रेंज देते. कंपनीच्या दाव्यानुसार, एक बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास 10 मिनिटांचा वेळ लागतो, तर दोन्ही बॅटऱ्या एकत्र चार्ज होण्यासाठी 6 तास 20 मिनिटांचा वेळ लागतो.

यामाहाच्या या प्रीमियम ई-स्कूटरमधील कडक फीचर्स

या स्कूटरमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट अनुभवासाठी अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स आणि रायडिंग मोड्स देण्यात आले आहेत:

  • इको, स्टँडर्ड आणि पॉवर असे 3 मुख्य रायडिंग मोड्स
  • झटपट वेगासाठी विशेष बूस्ट मोड आणि मागे घेण्यासाठी रिव्हर्स असिस्ट
  • 5 इंचाचा मोठा टीएफटी कलर डिस्प्ले आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी
  • रस्त्याचा मार्ग दाखवणारे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन
  • चावीशिवाय गाडी सुरू करण्यासाठी स्मार्ट की सिस्टीम
  • सुरक्षिततेसाठी सिंगल-चॅनल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम

सीटखालील जागेत कपात; एका बॅटरीवरही चालणार गाडी

या स्कूटरमध्ये तीच स्पोर्टी रायडिंग पोझिशन, मोठे टायर्स आणि मॅक्सी-स्कूटरची आरामदायक रचना मिळते ज्याने पेट्रोल मॉडेलला लोकप्रिय बनवले होते. मात्र, बॅटरी सेटअपमुळे या गाडीच्या डिकीच्या जागेत थोडी घट झाली आहे.

पेट्रोलवर चालणाऱ्या व्हेरियंटमध्ये सीटखाली 24.5 लीटरची जागा मिळते, तर या इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये रिमूवेबल बॅटरी फिक्स असल्यामुळे केवळ 15 लीटरची जागा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, रायडर्स ही स्कूटर केवळ एक बॅटरी पॅक लावून सुद्धा चालवू शकतात, मात्र अशा वेळी स्कूटरचा एकूण परफॉर्मन्स आणि ताकद थोडी कमी होते.

किंमतीचा विचार केला तर ही प्रीमियम मॅक्सी स्कूटर भारतीय बाजारातील ओला, टीव्हीएस, बजाज आणि एथर सारख्या कंपन्यांच्या बजेट मॉडेल्सपेक्षा बरीच महाग आहे. कारण यामाहाने या ई-स्कूटरमध्ये प्रीमियम बिल्ड क्वालिटी, स्पोर्टी रायडिंग डायनॅमिक्स आणि ब्रँड व्हॅल्यूवर जास्त भर दिला आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या