Home / देश-विदेश / Badrinath Mandir : बद्रीनाथ मंदिरातील देणगी चोरी ! कर्मचारी प्रमोद नौटियालला अटक

Badrinath Mandir : बद्रीनाथ मंदिरातील देणगी चोरी ! कर्मचारी प्रमोद नौटियालला अटक

Badrinath Mandir- बद्रीनाथ धाम मंदिरातील भाविकांच्या देणगीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेला आरोपी कर्मचारी प्रमोद नौटियाल याला पोलिसांनी देहरादून येथून...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

Badrinath Mandir- बद्रीनाथ धाम मंदिरातील भाविकांच्या देणगीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी फरार असलेला आरोपी कर्मचारी प्रमोद नौटियाल याला पोलिसांनी देहरादून येथून अटक केली आहे.काल रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास देहरादून येथून नौटियालला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशी आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला बद्रीनाथ कार्यालयात आणण्यात आले.  


या प्रकरणातील पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी नौटियाल याचा शोध सुरू केला होता. त्याच्या निवासाच्या संभाव्य ठिकाणी सातत्याने छापे टाकण्यात येत होते. अखेर देहरादूनमध्ये त्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपीच्या चौकशीतून या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. संबंधित कागदपत्रे, नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी सुरू आहे. तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे केला जाईल तसेच दोषी आढळणार्‍यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.


देणगी अपहार प्रकरणी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता 25 जूनच्या रेकॉर्डिंगमध्ये आरोपी प्रमोद नौटियाल नोटांची बंडले घेऊन जाताना दिसत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनीबद्री-केदार मंदिर समितीकडील अंतर्गत चौकशी अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत. अयोध्या राममंदिर चोरी प्रकरण गाजत असताना या मंदिरातही चोरी होत असल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली होती.मंदिर समितीचे अध्यक्षांचे पीए म्हणून कार्यरत असतानाही मंदिर समितीने प्रमोद नौटियाल याची  बद्रीनाथ येथे प्रोटोकॉल आणि देणगी मोजणीच्या कामावर नियुक्ती केली होती.2 जुलै रोजी भैरव सेना या संघटनेने देणगी मोजणीदरम्यान प्रमोद नौटियाल यांनी चोरी केल्याचा आरोप केला होता. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याचा दावाही करण्यात आला होता

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या