Home / लेख / Car Mileage Calculation: कारचे अचूक मायलेज कसे मोजायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

Car Mileage Calculation: कारचे अचूक मायलेज कसे मोजायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

Car Mileage Calculation: आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे प्रत्येक वाहनचालकाला आपली कार उत्तम मायलेज मिळावी असे...

By: Team Navakal
Car Mileage Calculation: कारचे अचूक मायलेज कसे मोजायचे? जाणून घ्या सोपी पद्धत
Social + WhatsApp CTA

Car Mileage Calculation: आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे प्रत्येक वाहनचालकाला आपली कार उत्तम मायलेज मिळावी असे वाटत असते. अनेकदा आपण कारच्या डॅशबोर्डवर दिसणाऱ्या डिजिटल स्क्रीनवरील आकड्यांवरूनच कारच्या मायलेजचा अंदाज लावतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की हा आकडा शंभर टक्के अचूक नसतो?

वास्तविक पाहता, कारच्या आत एक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट बसवलेले असते. हे युनिट इंजिनची गती, कारचा वेग आणि पार केलेले अंतर या सर्व बाबींचा तांत्रिक अभ्यास करून एक अंदाजित मायलेज स्क्रीनवर दाखवते. हे थेट इंधनाचा वापर मोजत नसल्याने या गणतात काही अंशी फरक पडू शकतो. म्हणूनच, कारचा अगदी अचूक मायलेज कसा मोजायचा, याची एक सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.

कारचा अचूक मायलेज मोजण्याची 5 टप्प्यांची सोपी पद्धत

जर तुम्हाला तुमच्या कारचा अचूक मायलेज जाणून घ्यायचा असेल, तर ‘टँक फुल’ ही सर्वात जुनी आणि खात्रीशीर पद्धत वापरा:

  • इंधन टाकी पूर्ण भरा: सर्वात आधी तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर जा आणि कारची इंधन टाकी ऑटो-कट होईपर्यंत पूर्णपणे फुल करून घ्या.
  • ट्रिप मीटर करा शून्य: टाकी फुल झाल्यानंतर कारच्या डॅशबोर्डवर असलेले ट्रिप मीटर रीसेट करा आणि 0 वर आणा. जर कारमध्ये ट्रिप मीटर नसेल, तर त्यावेळचे एकूण ओडोमीटर रीडिंग कागदावर लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून घ्या.
  • कार नेहमीप्रमाणे चालवा: यानंतर तुमची कार नेहमीप्रमाणेच रस्त्यावर चालवा. अचूक अंदाजासाठी कार किमान 100 किलोमीटर चालवणे आवश्यक आहे. यामध्ये शहर आणि हायवे दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांचा समावेश असावा, जेणेकरून मिक्स मायलेज कळू शकेल.
  • पुन्हा टाकी फुल करा: कार 100 ते 200 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर जा आणि टाकी पुन्हा ऑटो-कट होईपर्यंत फुल करा. या दुसऱ्या वेळी टाकीत किती लीटर इंधन बसले, त्याची अचूक नोंद ठेवा.
  • असे करा गणित: आता तुमच्या कारने पार केलेले एकूण अंतर (उदा. 150 किमी) याला दुसऱ्यांदा भरलेल्या इंधनाच्या लीटरने (उदा. 10 लीटर) भागा. म्हणजेच, 150 भागिले 10 बरोबर 15 किमी प्रति लीटर, हा तुमच्या कारचा खरा आणि अचूक मायलेज असेल.

कारचा मायलेज वाढवण्यासाठी ३ सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स

कारची योग्य काळजी घेतल्यास इंधनाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकतो:

१. टायरमधील हवेचा दाब: टायरमध्ये नेहमी कंपनीने सांगितलेला अचूक हवेचा दाब ठेवा. हवा कमी असल्यास टायर आणि रस्त्या मधील घर्षण वाढते, ज्यामुळे इंजिनवर ताण पडतो आणि मायलेज थेट कमी होतो.

२. योग्य वेळेत गियर बदलणे: कार चालवताना इंजिनच्या क्षमतेनुसार आणि योग्य वेगाने गियर बदला. विनाकारण कमी गियरमध्ये जास्त वेग वाढवल्यास इंधन जास्त जळते.

३. वेळेवर सर्व्हिसिंग: कारची नियमित सर्व्हिसिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. इंजिन ऑइल वेळेवर बदलल्याने इंजिनचे कार्य सुरळीत राहते आणि मायलेज वाढण्यास मदत होते.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या