Home / देश-विदेश / Vijeta Dahiya : विद्यार्थी रस्त्यावर लाठ्या खात असताना मुख्य प्रवक्त्यांचा अहंकार उफाळला? बर्गर विधानाचा फटका, मुख्य प्रवक्तेपदावरून थेट हकालपट्टी;’सीजेपी’ पक्षाची विजेता दहिया यांच्या बेजबाबदार विधानानंतर कडक कारवाई..

Vijeta Dahiya : विद्यार्थी रस्त्यावर लाठ्या खात असताना मुख्य प्रवक्त्यांचा अहंकार उफाळला? बर्गर विधानाचा फटका, मुख्य प्रवक्तेपदावरून थेट हकालपट्टी;’सीजेपी’ पक्षाची विजेता दहिया यांच्या बेजबाबदार विधानानंतर कडक कारवाई..

Vijeta Dahiya : ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आणि देशाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांचे उग्र आंदोलन सुरू असतानाच, आंदोलक...

By: Team Navakal
Vijeta Dahiya
Social + WhatsApp CTA

Vijeta Dahiya : ‘नीट’ (NEET) परीक्षा घोटाळ्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आणि देशाच्या विविध भागांत विद्यार्थ्यांचे उग्र आंदोलन सुरू असतानाच, आंदोलक संघटना असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (CJP) आतून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे मुख्य अधिकृत प्रवक्ते विजेता दहिया (Vijeta Dahiya) यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आंदोलनाच्या मूळ भावनेला हरताळ फासणारे आणि अत्यंत उद्धट वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून तीव्र चिखलफेक सुरू झाली. वाढता वाद आणि जनतेचा संताप लक्षात घेता, ‘सीजेपी’ने तातडीने कठोर पावले उचलत विजेता दहिया यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली असून, त्यांचे सर्व अधिकृत अधिकार तातडीने काढून घेतले आहेत.

काय आहे त्या व्हायरल व्हिडिओमध्ये? दहियांचे वादग्रस्त वक्तव्य-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विजेता दहिया हे आंदोलनादरम्यान ‘बर्गर’ खाण्यावरून नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. मात्र, हे उत्तर देताना त्यांचा नूर अत्यंत आक्रमक आणि बेजबाबदार होता.

व्हिडिओतील त्यांचे मूळ वक्तव्य-
“मी बर्गर का खाल्ला? आज देशात हाच काय तो सर्वात मोठा मुद्दा उरला आहे का? कोणताही सामान्य माणूस बर्गर का खातो? एकतर त्याला भूक लागलेली असते किंवा त्याचे बर्गर खाण्याचे मन असते, बस्स एवढेच! तुम्ही मला या गोष्टीसाठी इतके जाब विचारत आहात, जणू काही ‘आंदोलक असणे’ (Protester) ही माझी एखादी नोकरी आहे का? तुम्ही माझी या कामासाठी निवड केली आहे का? मुळात लोकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, मला नाही.”

त्यांनी पुढे अत्यंत संतापून म्हटले, “तुमच्या या अशा मूर्खपणाच्या (Nonsense) विचारसरणीत मला अजिबात अडकायचे नाही. तुमच्यासारख्या मूर्ख लोकांना खूश करण्यासाठी मला राजकारणात यायचे नाही, हे मी स्पष्ट करतो. मी सध्या जे काही करत आहे, ते देशासाठी करत आहे आणि स्वतःच्या मर्जीने करत आहे. मी या संदर्भात कोणालाही उत्तर देण्यास बांधील नाही; आणि हो, मला आवडेल तेव्हा मी बर्गर खाणारच!”

सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट
विजेता दहिया यांच्या या उद्दाम आणि अहंकारयुक्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आणि विशेषतः आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर जोरदार आक्षेप घेतला. एका बाजूला निष्पाप विद्यार्थी पोलिसांचा लाठीमार सहन करत आहेत, तर दुसरीकडे पक्षाचे मुख्य प्रवक्ते अशा प्रकारची विधाने करत आहेत, यावरून त्यांच्या असंवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. अनेकांनी याला मूळ देशव्यापी आंदोलनाच्या तत्त्वांशी आणि नैतिकतेशी केलेली प्रतारणा असल्याचे म्हटले आहे.

‘कॉकरोच जनता पार्टी’कडून तात्काळ कारवाई आणि जाहीर निषेध
हा वाद अत्यंत वेगाने चिघळत चालल्याचे पाहून ‘कॉकरोच जनता पार्टी’ने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून (Official Social Media Handle) एक कडक पत्रक जारी केले. पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमचे अधिकृत प्रवक्ते विजेता दहिया यांनी केलेले वक्तव्य आणि त्यांचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे, पक्ष त्याची तीव्र शब्दांत निंदा करतो. ज्या वेळी आमचे हजारो तरुण, शांततापूर्ण आंदोलक आणि संघटनेचे सदस्य रस्त्यावर उतरून पोलिसांच्या अमानुष कारवाईला तोंड देत आहेत, रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशा अत्यंत संवेदनशील काळात समोर आलेला हा व्हिडिओ आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.”

पक्षाने पुढे स्पष्ट केले की, “अशा प्रकारचे बेजबाबदार आचरण आणि अहंकार ‘सीजेपी’मध्ये कधीही खपवून घेतला जाणार नाही. हे वर्तन आमच्या आंदोलनाच्या मूल्यांच्या, सिद्धांतांच्या आणि नैतिकतेच्या पूर्णपणे विरोधात आहे. याच कारणास्तव पक्षाने तात्काळ निर्णय घेऊन विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून बडतर्फ केले आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या