Home / arthmitra / Robert Kiyosaki Warning : ‘विनाशकारी क्रॅश येणार…’; प्रसिद्ध लेखकाची मोठी भविष्यवाणी; ‘या’ गोष्टीत गुंतवणुकीचा सल्ला

Robert Kiyosaki Warning : ‘विनाशकारी क्रॅश येणार…’; प्रसिद्ध लेखकाची मोठी भविष्यवाणी; ‘या’ गोष्टीत गुंतवणुकीचा सल्ला

Robert Kiyosaki Warning : जगातील कोट्यवधी लोकांना आर्थिक साक्षरता देणारे आणि ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या...

By: Team Navakal
Robert Kiyosaki Warning
Social + WhatsApp CTA

Robert Kiyosaki Warning : जगातील कोट्यवधी लोकांना आर्थिक साक्षरता देणारे आणि ‘रिच डॅड पुअर डॅड’ (Rich Dad Poor Dad) या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा दिला आहे.

कियोसाकींच्या मते, अमेरिकेच्या शेअर बाजारात “विनाशकारी क्रॅश” येणार असून, यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होणार आहे.

X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत कियोसाकी यांनी म्हटले आहे की, “मोठा क्रॅश सुरू होत आहे: लाखो लोक उद्ध्वस्त होतील. स्वतःचे संरक्षण करा.” आपल्या पारंपारिक गुंतवणूक तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे मत मांडणाऱ्या कियोसाकी यांनी इशारा दिला आहे की, Wall Street वरून लाखो डॉलर्सची संपत्ती लवकरच नाहीशी होईल, कारण जागतिक अर्थव्यवस्था संकटाच्या दिशेने जात आहे.

कियोसाकी यांनी यापूर्वी 2022 मध्ये तसेच कोविड-19 साथीच्या वेळीही जगातील सर्वात मोठा क्रॅश येण्याचा इशारा दिला होता.

गुंतवणुकीचे ‘सुरक्षित कवच’

या अत्यंत अस्थिर काळात गुंतवणूकदारांनी आपले पैसे सुरक्षित ठेवावेत, यासाठी कियोसाकी यांनी ‘कठीण मालमत्तां’कडे (Hard Assets) वळण्याचा आग्रह केला आहे.

कियोसाकी यांच्या मते, सोने (Gold), चांदी (Silver), बिटकॉइन (Bitcoin) आणि इथेरियम (Ethereum) या मालमत्ता सर्वाधिक सुरक्षित आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, स्टॉक्स, बॉण्ड्स आणि फियाट चलनांसारख्या कागदी मालमत्ता या ‘खोट्या पैशां’सारख्या आहेत आणि त्या कधीही कोसळू शकतात. याउलट, मौल्यवान धातू आणि क्रिप्टोकरन्सी या महागाईआणि कर्ज संकटांविरुद्ध उत्तम संरक्षण देतात.

वाद-विवाद आणि तज्ज्ञांची भूमिका

कियोसाकी यांच्या या इशाऱ्यावर ऑनलाईन जगात मोठा वाद सुरू झाला आहे. एका बाजूला काही फॉलोअर्सनी त्यांच्या भीतीला दुजोरा दिला आहे, तर अनेक जण त्यांच्या वारंवार येणाऱ्या ‘क्रॅश’च्या भाकितांवर टीका करत आहेत. एका यूजरने म्हटले, “बॉब, तुम्ही प्रत्येक वर्षी क्रॅश येणार असे सांगता… कधीतरी ते योगायोगाने बरोबर ठरेल.”

दुसऱ्या बाजूला, बाजारातील सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास, कियोसाकींनी सुचवलेल्या मौल्यवान धातूंमध्ये आणि क्रिप्टोकरन्सीमध्येही घसरण दिसून आली आहे. बिटकॉइन ऑक्टोबरमध्ये $1,26,000 च्या विक्रमी उच्चांकावरून घसरून या महिन्यात सुमारे $1,04,782 पर्यंत खाली आले आहे.

हे देखील वाचा – ChatGPT Go भारतीयांसाठी 1 वर्षासाठी मोफत; कसा मिळेल फ्री ॲक्सेस? जाणून घ्या

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या