Home / क्रीडा / चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पुन्हा वाद सुरु! पाकिस्तानची मागणी भारताने फेटाळली

चॅम्पियन्स ट्रॉफीवरून पुन्हा वाद सुरु! पाकिस्तानची मागणी भारताने फेटाळली

नवी दिल्ली -पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून सुरु असलेला वाद ३० नोव्हबरच्या बैठकीत मिटला असे वाटत होते. पण पाकिस्तानने...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली -पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून सुरु असलेला वाद ३० नोव्हबरच्या बैठकीत मिटला असे वाटत होते. पण पाकिस्तानने पुन्हा काही अटी घातल्या आहेत . त्या बीसीसीआयने फेटाळल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.
३० नोव्हेंबरच्या आयसीसीच्या बैठकीत पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाकिस्तानातील आयोजनाचा वाद मिटला असे वाटत होते . पण आता मात्र पाकिस्तानने आयसीसीसमोर दोन अटी ठेवल्या आहेत . त्यातील पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे २०३१ पर्यंतचे आयसीसीचे सर्व सामने हायब्रीड मॉडेलनुसारच खेळवले जावेत. कारण पाकिस्तान कोणत्याही स्थितीत भारतात आपला संघ पाठवणार नाही . पाकिस्तानची ही अट बीसीसीआयला मान्य नाही. तर आयसीसीने त्यांच्या महसुलातून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या रकमेत ५.७५ टक्के इतकी वाढ करावी, अशी अट घातली आहे. मात्र ही अटही आयसीसीला मान्य नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे भवितव्य पुन्हा एकदा अधांतरी लटकणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या